• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

डॉ. प्रदिप साखरे खान्देश आयकॉन पुरस्काराने सन्मानित

Apr 29, 2025

Loading

डॉ. प्रदिप साखरे खान्देश आयकॉन पुरस्काराने सन्मानित

भुसावळ -भुसावळ नगरपरिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूलचे क्रीडा शिक्षक तथा शॉट पीच क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप रवींद्र साखरे यांनी सामाजिक, पर्यावरण, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रात आजपर्यंतच्या केलेल्या कार्याबद्दल त्यांना जळगांव येथे खान्देश आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर केलेले क्रीडा कार्य व आंतरराष्ट्रीय स्तरावर वेतनाम ,थायलंड ,चायना, मलेशिया, लावोस, इंडोनेशिया मंगोलिया , नेपाळ, अशा विविध देशांमध्ये एशियन गेम, बीच एशियन गेम, इंडोअर एशियन गेम, वर्ल्ड चॅम्पियनशिप, अशा विविध स्पर्धांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व तसेच प्रशिक्षित म्हणून काम केलेले आहे. विविध तालुका, जिल्हा,राज्य स्पर्धा राष्ट्रीय स्पर्धांचे व प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करणे. क्रीडा शिक्षकांना संघटनेच्या माध्यमातून न्याय मिळवून देणे , त्यांना पुरस्कार देऊन गौरवणे, दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करणे तसेच त्यानी 2012पासुन समाजातील पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचा कमी झालेला दर, स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी व मुलीच्या जन्माचे स्वागत व्हावे यासाठी बेटी बचाव बेटी पढाव अंतर्गत कार्य केले. त्या माध्यमातून आठ मार्च रोजी जन्मलेल्या बालिकांचा व त्यांच्या मताचे त्यांचा सन्मान करणे तसेच पर्यावरण प्रदूषण मंडळाच्या माध्यमातून वृक्षारोपण करणे, आर्यन फाउंडेशन च्या माध्यमातून गरिबांना अन्नदान, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेवून वह्या, शालेय साहित्य वाटप करणे, रक्तदान करने, अशा विविध कार्याची दखल घेऊन सप्तरंग मराठी चैनल व सूर्या फाउंडेशन यांच्या द्वारा व सुप्रसिद्ध मराठी सिनेअभिनेते अभिजीत खांडकेकर, आ. अमोलदादा पाटील- पारोळा-एरंडोल मतदार संघ, आ. राजुमामा भोळे-जळगांव मतदार संघ ,अॅड. संजयजी राणे राष्ट्रीय उपाध्यक्ष ऑल इंडिया सिलेवर्कर्स असो. किरण पातोंडेकर,पातोंडेकर ज्वेलर्स, मा.डॉ. मंदार पंडित संचालक पंडित मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल , मा.डॉ. अर्चना सुर्यवंशी.मोवेत इंटरनॅशनल स्कुस, सप्तरंग मराठी चैनल चे पंकज रमेश कासार यांच्या हस्ते डॉ. प्रदीप रवींद्र साखरे (सर) यांना खान्देश आयकॉन पुरस्कार 2025 देऊन गौरविण्यात आले. त्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed