शालांत परीक्षा निकाल उद्या जाहीर
( विशेष प्रतिनिधी उदय नरे ) महाराष्ट्र बोर्डाच्या SSC परीक्षेचा निकाल टार्गेट लर्निंग व्हेंचर्सच्या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध !
: नुकत्याच जाहीर झालेल्या HSC बोर्ड परीक्षेच्या निकालास मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर, टार्गेट लर्निंग व्हेंचर्स प्रा. लि., महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सहकार्याने आता इयत्ता दहावी (SSC) च्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचे निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे. उद्या दिनांक १३ मे २०२५ रोजी दुपारी १:०० वाजता SSC बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर होणार असून विद्यार्थी खालील लिंकवर क्लिक करून आपले निकाल पाहू शकणार आहेत: https://results.targetpublications.org/
यापूर्वी, ५ मे २०२५ रोजी HSC परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यावेळी जवळपास ३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी टार्गेट लर्निंग व्हेंचर्सच्या संकेतस्थळावरून त्यांचा निकाल यशस्वीपणे व अगदी जलद प्राप्त केला.
टार्गेट लर्निंग व्हेंचर्स ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था असून, महाराष्ट्र राज्य मंडळाच्या सहकार्याने बारावी व दहावीचे निकाल आपल्या संकेतस्थळावर जाहीर करणारी ही पहिली शैक्षणिक संस्था आहे. टार्गेटच्या या उपक्रमामुळे बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरील संभाव्य तांत्रिक अडचणी व अतिरिक्त ताण टाळण्यास मदत होणार आहे. गेल्या वर्षी ३ लाखांहून अधिक SSC च्या विद्यार्थ्यांनी टार्गेट लर्निंग व्हेंचर्सच्या माध्यमातून आपले निकाल प्राप्त केले होते आणि यावर्षी देखील HSC च्या ३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेतला.
फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या SSC बोर्ड परीक्षेला महाराष्ट्रातून सुमारे १६ लाख विद्यार्थी बसले होते. बोर्डातर्फे त्यांची अधिकृत संकेतस्थळे, mahahsscboard.in आणि mahresult.nic.in वर निकाल जाहीर होतीलच, यासोबतच विद्यार्थी टार्गेट लर्निंग व्हेंचर्स प्रा. लि. च्या https://results.targetpublications.org/ या संकेतस्थळावर देखील आपले निकाल पाहू शकतील.
टार्गेट लर्निंग व्हेंचर्स प्रा. लि. चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. दिलीप गंगारमानी म्हणाले, “विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद आणि त्यांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास यासाठी आम्ही विद्यार्थी आणि पालकांचे आभारी आहोत. HSC परीक्षेच्या निकालास मिळालेला प्रतिसाद प्रचंड उत्साहवर्धक होता आणि आता SSC च्या विद्यार्थ्यांसाठी देखील आम्ही ही सोय उपलब्ध करून देत आहोत, याचा आम्हाला आनंद आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल सहज आणि त्वरित उपलब्ध व्हावेत, हाच आमचा उद्देश आहे. “
निकाल जाहीर झाल्यावर, विद्यार्थी खालील संकेतस्थळांवर आपले निकाल पाहू शकतील:
https://mahresult.nic.in/
• https://results.targetpublications.org/
विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी पुढील पायऱ्यांचा अवलंब करावा:
• https://results.targetpublications.org/ या संकेतस्थळाला भेट द्या.
• तुमचा बैठक क्रमांक (हॉलतिकीट क्रमांक) नमूद करा.
• निकाल डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.