• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

पोलिसांतील साहित्यिक व्यक्तिमत्वाचे अभिनंदनीय साहित्य. खडकपाडा पोलिस स्टेशनचे साहित्यिक अर्जुन डोमाडे यांना कुंडल कृष्णाई पुरस्कार प्रदान

May 13, 2025

Loading

पोलिसांतील साहित्यिक व्यक्तिमत्वाचे अभिनंदनीय साहित्य.

खडकपाडा पोलिस स्टेशनचे साहित्यिक अर्जुन डोमाडे यांना कुंडल कृष्णाई पुरस्कार प्रदान

ठाणे:कल्याण(मनिलाल शिंपी) सातारा येथील कुंडल कृष्णाई या “आम्ही पुस्तकांचे देणं लागतो” हे ब्रीद वाक्य घेऊन साहित्य विषयक कार्य करणाऱ्या संस्थेचे सन २०२५ चे कथा, कविता बाल साहित्य, प्रवास वर्णन इत्यादी साहित्य विभागाचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले . त्यामधील कथा विभागातील कुंडल कृष्णाई हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय उत्कृष्ट वाड :मय पुरस्कार पोलिसातील कवी, कथाकार अर्जुन डोमाडे यांच्या डिंपल पब्लिकेशन प्रकाशित “भितुर” या कथासंग्रहाला जाहीर झाला असून नुकत्याच सातारा येथे संपन्न झालेल्या कुंडल कृष्णाई प्रतिठानच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध साहित्यिक कादंबरीकार श्री शरद तांदळे यांचे शुभ हस्ते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. हनुमंतराव जगदाळे व सचिव सौ. सावित्री जगदाळे यांचे उपस्थित हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अर्जुन डोमाडे यांनी त्यांच्या पहिल्याच कथा संग्रहाला मिळालेला हा पहिलाच पुरस्कार “ज्याचे श्रेय त्याला द्यावे” या भावनेतून त्यांच्या मनात साहित्याचे बीज पेरणारे गुरुवर्य कै. अरुण मैड व या कथासंग्रहातील कथांचे कथाबीज पुरविणारे कथेचे ज्ञात ,अज्ञात नायक व नायिका यांना अर्पण केला आहे. पुरस्कार मिळाल्या बद्दल अर्जुन डोमाडे यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed