• Sun. Jun 15th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

डीवायएसपी वासुदेव देसले यांचा वाढदिवस अनाथ मुलांसाठी आशेचा दिवा बनला

Jun 9, 2025

Loading

डीवायएसपी वासुदेव देसले यांचा वाढदिवस अनाथ मुलांसाठी आशेचा दिवा बनला

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
कर्तबगार अधिकारी वासुदेव देसले साहेब (डिवायएसपी, नाशिक ग्रामीण) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी अनाथ मुलांबरोबर दुपारचे भोजन घालवले. यावेळी त्यांनी १२० अनाथ मुलांसाठी १००० लिटर क्षमतेचे वॉटर टँक उपलब्ध करून दिले. तसेच मुलांच्या निवासस्थानांची सुशोभिकरण आणि अद्ययावत व्यवस्था करुन दिली, तसेच अभ्यासासाठी टेबल आणि खुर्च्या दिल्याने मुलांचे शिक्षणात रुची वाढेल या आशेने होम हवन करण्यात आले.
या कार्यक्रमात दहिवद गावाच्या मा. लोकनियुक्त सरपंच तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सौ. सुषमाताई देसले यांचाही विशेष सहभाग होता.
           

 

 

 

 

 

 

 

 

 

देसले दांपत्याने या आधीही अनेक वेळा आपल्या वाढदिवसाला समाजसेवेचा भावनापुरक उपक्रम राबवून अनेक गरजू, उपेक्षित मुलांना मिष्टान्न भोजन तसेच शालेय उपयोगी वस्तू प्रदान केल्या आहेत. या समर्पित प्रयत्नांनी सामाजिक बांधिलकीचा उत्तम आदर्श निर्माण झाला आहे.
अशा प्रेरणादायी कार्यासाठी व वाढदिवसाच्या निमित्ताने देसले परिवारावर प्रेम करणारे सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला..

 

चौकट
वाढदिवस समाजाच्या उपेक्षित घटकांसाठी उपक्रम करून साजरा करणे अत्यंत अर्थपूर्ण आणि प्रेरणादायी ठरतो. यामुळे केवळ व्यक्तीगत आनंद नाही, तर समाजातील गरजू आणि दुर्लक्षित लोकांपर्यंत मदतीचा हात पोहोचतो. अशा कार्यक्रमांमुळे सामाजिक एकात्मता वाढते, मानवतेचा संदेश पसरतो, आणि उदारतेच्या संस्कृतीला चालना मिळते. वाढदिवस या खास दिवशी उपेक्षित घटकांसाठी मदतीचे उपक्रम राबवणे म्हणजे आपल्या यशाचे खरे मोल समाजसेवेतून व्यक्त करणे होय. त्यामुळे हा प्रकार समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यास महत्त्वाचा ठरतो असे नाशिकचे ग्रामीणचे डीवायएसपी वासुदेव देसले साहेब यांनी मराठी लाईव्ह न्युजशी बोलतांना सांगितले

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed