
भालेरावनगर व पाटीलगढीमध्ये गुणगौरव सोहळा; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, बापूसाहेब संदीप पाटील यांना लोकनायक पुरस्कार मिळाल्याबद्दल झाला सन्मान..
भालेरावनगर व पाटीलगढीमध्ये गुणगौरव सोहळा; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, बापूसाहेब संदीप पाटील यांना लोकनायक पुरस्कार मिळाल्याबद्दल झाला सन्मान..
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
भालेरावनगर व पाटीलगढी या दोन्ही कॉलनींच्या संयुक्त विद्यमाने आयोजित त्रिवेणी संगमाच्या कार्यक्रमांतर्गत मुंदडा अपार्टमेंट अमळनेर येथे एक भव्य गुणगौरव सोहळा संपन्न झाला. यावेळी इयत्ता दहावी व बारावी परीक्षा उत्साहपूर्ण यशाने उत्तीर्ण झालेल्या १९ गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब संदीप पाटील (मा. जि.प. सदस्य जळगाव) यांचा लोकमत परिवाराकडून “लोकनायक पुरस्कार” देऊन सन्मान करण्यात आला. याशिवाय, आबासाहेब गोकुळ पाटील (मा. केंद्रप्रमुख, पं. स. अमळनेर) यांची साने गुरुजी विद्या मंदिर येथे तज्ञशिक्षण संचालक म्हणून पुनः नेमणूक झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्रीराम हरचंद पाटील (ग्रेडेड मुख्याध्यापक) होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये मा. गोकुळ पाटील, मा. विलास पाटील, मा. व्ही.ए. पाटील, मा. हरिचंद्र कढरे, मा. गंगाधर अहिरराव (स्टेट बँक) तसेच समाजसेवक श्री रामलाल आत्माराम पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक बापूसाहेब विजय पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन श्री दिनेश सावळे यांनी प्रभावीपणे केले. उद्घाटकत्वही भालेरावनगर-पाटीलगढी कॉलनीतील बापूसाहेब विजय पाटील यांच्या हस्ते होते.
या सोहळ्यात १९ गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला. लोकनायक पुरस्कारप्राप्त बापूसाहेब संदीप पाटील यांचा सत्कार नानासाहेब श्रीराम पाटील यांनी केला तर तज्ञ संचालकपदी नियुक्त झालेले गोकुळ पाटील यांचे सत्कार दादासाहेब रामलाल आत्माराम यांनी केले. तर बेस्ट शिक्षक पुरस्कार गुणवंत शिक्षक श्री महेंद्र वसंतराव काटे यांना देण्यात आला, त्यांचा सत्कार श्री अनिल दुसाने यांनी केला.
विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी त्यांच्या मनोगतीत कृतज्ञता व्यक्त केली. मोहन गणेश पाटील, प्रिया शरद चौधरी, आदित्य लक्ष्मण पाटील यांनी यशस्वीतेचे महत्त्व सांगितले. याशिवाय पालकांच्या वतीने लक्ष्मण पाटील व श्री बाविस्कर सर यांनीही मोलाचे विचार मांडले.
मुख्य पाहुणे आबासाहेब गोकुळ पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रबोधन करताना “आम्ही घडलो तुम्ही ही घडाना” या उक्तीप्रमाणे प्रेरणा दिली. त्यांनी सातत्य, मेहनत, जिद्द, नियोजन व चांगल्या मार्गदर्शनावर भर देत यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहन दिले. याशिवाय शिक्षणाच्या महत्त्वावर, योग्य मार्गदर्शन व इच्छाशक्तीवर त्यांनी विशेष भर दिला.
लोकनायक पुरस्कारप्राप्त बापूसाहेब संदीप पाटील यांनी सामाजिक कार्यात मोठे योगदान दिले आहे. ते पाणी फाउंडेशन, जलजीवन मिशन, रेन हार्वेस्टिंग सारख्या सामाजिक उपक्रमांमध्ये मोलाचे कार्य करत आहेत. त्यांनी गावातील प्रत्येकाला एकत्र करण्याचा उत्तम कार्यशैलीने प्रशंसा केली गेली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भालेरावनगर व पाटीलगढीतील सर्व ज्येष्ठ, तरूण, महिला-मंडळ, पुरुष बांधवांनी उल्लेखनीय सहकार्य केले.
अखेर नानासाहेब श्रीराम पाटील यांनी अध्यक्षीय भाषणातून आभार मानले. तसेच श्री भाऊसाहेब रामकृष्ण पाटील यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
या गौरवसोहळ्याने प्रतिभावंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी ऊर्जा, प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळाले असून सामाजिक योगदानासाठीही प्रोत्साहन दिले आहे.