महात्मा फुले हायस्कूल येथे सामाजिक न्याय दिनानिमित्त निबंध स्पर्धा !…
कष्टकरी, शेतकरी, रयतेचे दुःख जाणणारा लोकराजा !… – पी डी पाटील
धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील
धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथील सामाजिक न्याय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तदनंतर लोककल्याणकारी राजा छत्रपती राजर्षी शाहूजी महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.सामाजिक न्याय दिन समारोहाचे प्रास्ताविक एस.एन.कोळी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार होते. मान्यवरांच्या हस्ते आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधत शाळेत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शै.साहीत्याचे बक्षीस वाटप करण्यात आले. जया सोनवणे व शितल भोई यांनी शाहू महाराज यांचे जीवन कार्याची माहिती सांगितली. शाळेतील उपशिक्षक पी डी पाटील यांनी लोकराजा छत्रपती शाहूजी महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांचे सामाजिक – शैक्षणिक कार्य विशद केले. सर्वसामान्य जनता, कष्टकरी, शेतकरी रयतेचे दुःख जाणणारा राजा – मोठ्या दिलाचा राजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज होय असे प्रतिपादन पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पवार यांनी महाराजांचे कार्य आपल्यासाठी प्रेरणादायी आहे त्यांच्या विचारांवर चालण्याचा अनमोल संदेश दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस एन कोळी तर आभार एच डी माळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू-भगिनी कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले.