महाराष्ट्र माळी समाज महासंघाची राज्यस्तरीय बैठक नाशिकला १३ जुलैला— नवीन चेहऱ्यांना संधी, नवीन कार्यकारिणीची होणार घोषणा
जळगांव प्रतिनिधी
माळी समाजाच्या अधिकृत व्यासपीठ महाराष्ट्र माळी समाज महासंघ या राज्यस्तरीय संघटनेची नाशिक येथे महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी बैठक दिनांक १३/०७/२०२५ रोजी दुपारी ०२:०० ते ०५:०० या वेळात शिवनेरी बिल्डिंग, पहिला मजला, कॉन्फरन्स मीटिंग हॉल नाशिक शासकीय विश्रामगृह गडकरी चौक, एल आय सी ऑफिस जवळ, मुंबई नाका नाशिक ४२२००२, या ठिकाणी संपन्न होत आहे. सदर बैठकीमध्ये महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अनिलभाऊ महाजन मुंबई हे उपस्थित राहणार आहेत. तसेच महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे सर्व विश्वस्त सदर बैठकीला उपस्थित राहतील. माळी समाजातील निवडून आलेले सर्व आमदार व कॅबिनेट मंत्री यांचा या बैठकीत अभिनंदनचा ठराव पास करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील माळी समाजातील तरुण कार्यकर्त्यांना तालुका,जिल्हा पातळीवर नवीन पदनियुक्त केले जाणार आहे. नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. सदर बैठकीत मागील सर्व कार्यकारणी रद्द करून नवीन कार्य कार्यकारणी ची घोषणा करण्यात येणार आहे. राज्यातील माळी समाजातील व महाराष्ट्र माळी समाज महासंघातील काम करणारे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी सर्वानी सदर बैठकीला उपस्थित राहावे असे आहवान महासंघाने केले आहे. एक दिवस समाजासाठी या संकल्पनेतून महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे आगामी काळात कार्य सुरू राहणार आहे. एक अनोख काम नव्याने माळी समाजाच महासंघमार्फत सुरू करण्यात येत आहे.असे यावेळी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.