जळगाव ग्रामीण बीएलओ प्रशिक्षण उत्साहात संपन्न !…
तहसिलदार महेंद्र सूर्यवंशी यांच्या हस्ते BLO संजय गायकवाड यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान !…
धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर
धरणगांव – वराड बुद्रुक ता.धरणगाव 14 जळगाव ग्रामीण मतदारसंघातील जळगाव तालुक्यातील 196 व धरणगाव तालुक्यातील 157 अशा एकूण 353 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ यांचे प्रशिक्षण तीन टप्प्यात जळगाव ग्रामीण मतदान नोंदणी अधिकारी मा.निवृत्ती गायकवाड साहेब,सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार मा. महेंद्र सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाले.
दिल्लीहून खास प्रशिक्षण घेऊन आलेले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसई खुर्द येथील उपशिक्षक व बीएलओ संजय गायकवाड यांनी उपस्थित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना 6, 6A,7 व 8 नंबर फॉर्म भरण्याविषयी तसेच BAG व BLA ग्रुप बीएलओ ॲप,वोटर हेल्पलाइन ॲप याविषयी पीपीटी द्वारे सखोल असे मार्गदर्शन केले व विचारलेल्या शंकांचे निरसन केले. यावेळी दिल्लीहून प्रशिक्षण घेऊन आलेले BLO संजय गायकवाड यांचा तहसीलदार मा.महेंद्र सूर्यवंशी साहेब व उपस्थित पदाधिकारी यांनी बुके देऊन केला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी नायब तहसीलदार सी.बी.देवराज साहेब,किशोर कदम साहेब,नवीन भावसार साहेब तहसीलचे महेंद्र पवार, ज्ञानेश्वर माऊली,नितीन माळी यांनी परिश्रम घेतले.