चिमणपूरी पिंपळे येथे महसूल समाधान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद – शासन थेट जनतेच्या दारी
ः
अमळनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील दि. 25 मार्च 2025 च्या शासननिर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या योजनेंतर्गत ” छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत ” वावडे मंडळ भागातील वावडे, तरवाडे, लोण बु, लोण खु, लोणचारम, लोण सिम, जवखेडा, मांडळ, शिरसाळे बु, शिरसाळे खु, झाडी, ढेकू चारम, आर्डी, खडके, आनोरे, पिंपळे बु, चिमणपूरी, पिंपळे खु, अटाळे या गावातील नागरिकांसाठी दिनांक 30/06/2025 (वार सोमवार) रोजी गुरूदत्त मंदिर चिमणपूरी पिंपळे ता. अमळनेर येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीराचे उदघाटन मा. जयश्रीताई पाटील, माजी नगरध्यक्षा, नगरपरिषद अमळनेर/माजी जि.प. सदस्य जिल्हा परिषद, जळगाव यांचे हस्ते करण्यात आले.सदर शिबीरात मा.श्री. नितीनकुमार मुंडावरे, उपविभागीय अधिकारी अमळनेर भाग अमळनेर, श्री. रुपेशकुमार सुराणा, तहसिलदार अमळनेर, नरेंद्र पाटील, गटविकास अधिकारी अमळनेर, महिला व बालकल्याण अधिकारी प्रेमलता पाटील, निवडणुक नायब तहसिलदार प्रशांत धमके, संजय गांधी योजना नायब तहसिलदार राजेंद्र ढोले व तालुका स्तरावरील सर्व कार्यालये यांचे अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते. प्रत्येक विभागाने स्वतः उपस्थित राहून आपआपल्या विभागाचे स्टॉल लावून मंडळ भागातील सर्व गावातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, विदयार्थी व महिला यांचे शासकीय विभागांशी संबंधित तक्रारींचे/समस्यांचे निराकरण करुन वंचित लाभार्थीना मा. जयश्रीताई पाटील, माजी नगरध्यक्षा नगरपरिषद अमळनेरतसेच माजी जि.प. सदस्य जिल्हा परिषद, जळगाव व मा.श्री. नितीनकुमार मुंडावरे, उपविभागीय अधिकारी अमळनेर भाग अमळनेर यांचे हस्ते प्रमाणपत्र/धनादेशाचे वाटप करण्यात आले. उक्त शिबीरात खालील कार्यालयांकडून लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले.
76- नवीन शिधापत्रिका, दुबार शिधापत्रिका
,संगायो शाखा तहसिल कार्यालय अमळनेर
343 डीबीटी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
3 सेतु शाखा तहसिल कार्यालय अमळनेर
02 – नवीन लाभार्थी यांचे अर्ज भरुन घेण्यात आले.103 – उत्पन्नाचे दाखले वितरण,29 – राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र वितरण,29 – रहिवासी प्रमाणपत्र वितरण.141 – जातीचे दाखले वितरण,21- आधार नोंदणी,51- आधार दुरुस्ती करण्यात आली.
सदर शिबीरात अंदाजे 600 ते 650 लोकांनी उपस्थिती नोंदवून समाधान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मा.श्री. नितीनकुमार मुंडावरे, उपविभागीय अधिकारी अमळनेर भाग अमळनेर यांनी सदर कार्यक्रमाची प्रस्तावना केली. वरील कार्यक्रमाला प्रथम लोकनियुक्त सरपंच महिला सौ वर्ष युवराज पाटील यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिले व परिषद परिसरातील लोकांना जनजागृती करण्यासाठी सहकार्य ग्रुप ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील पुरुषोत्तम चौधरी माझी शक्ती संघ प्रेसिडेंट संजय पुनाजी पाटील निंबा बापू चौधरी आठवड्याचे सरपंच सदा बापू पाटील पिंपळे बुद्रुकचे सरपंच माजी योगेश अशोक पाटील उपलब्ध होते ग्रामीण भागातील सर्व गावकरी परिसरातील मोठ्या संख्येने लोकांनी शिबिराचा लाभ घेतला व संजय निराधार उस्मानाबाद सर्व माता-भगिनींना अल्पोपराची व्यवस्था सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांनी केलेली होतीश्री.संजय पाटील, उपशिक्षक, आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालय, मंगरुळ यांची सुत्रसंचालन केले. तसेच श्री. प्रशांत धमके, निवडणुक नायब तहसिलदार यांनी उपस्थितांचे आभार मानले.