सातत्य, सराव आणि गुणवत्ता पूर्ण मार्गदर्शन,मोबाईल नसणे हेच यशाचे कारण – खिलेश पाटील
नोबेल फाउंडेशन तर्फे गुणवंत संवाद
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- अभ्यासातील सातत्य मागील प्रश्नपत्रिकांचा सराव तसेच गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन यामुळेच यश मिळते असे प्रतिपादन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे येथील संगणक विज्ञान शाखेचे खिलेश पाटील यांनी केले. खिलेश पाटील एमएचटी-सीईटी परीक्षेत 99 75 गुण प्राप्त करून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. याप्रसंगी मंचावर पांडुरंग पाटील, सौ नयना पाटील ,नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील, नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचे परीक्षा प्रमुख विवेक साळुंखे उपस्थित होते.
याप्रसंगी खिलेश पाटील व पालकांचा सन्मान करण्यात आला. पुढे बोलताना श्री. पाटील यांनी सांगितले की” प्रवेश परीक्षांचा अभ्यास करताना मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकाचा सराव आपल्याला अभ्यासाचा दृष्टिकोन देतो .त्यामुळे सराव आवश्यक आहे तसेच प्रत्येक टॉपिकवर विविध काठिण्य पातळीचे प्रश्न सोडवणे अत्यंत गरजेचे असते. तसेच जेईई व एमएचटी सीइटी या परीक्षांचा अभ्यास करताना गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन तसेच मेंटरशिपची गरज असते.
दहावीचा निकाल लागल्यानंतर मी अकरावी आणि बारावी हे दोन वर्ष सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर होतो.माझे कोणत्याही सोशल मीडियाच्या ॲपवर खाते नव्हते. यामुळे मी मोठे यश मिळवू शकलो. माझ्याजवळ साधा बटनवाला मोबाइल होता. सोशल मीडिया हा विद्यार्थ्यांचा शत्रू असतो.
माझ्या यशामागे माझ्या आई वडील तसेच नोबेल फाउंडेशनचे जयदीप पाटील सर यांचा वाटा आहे.
याप्रसंगी पांडुरंग पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. खूप मोठी स्वप्न बघा .तुम्ही माउंट एवरेस्ट चढण्याचा प्रयत्न केला तर लहान लहान शिखरे पादाक्रांत करायला कमी मेहनत लागते असा दृष्टिकोन ठेवा. प्रत्येक मुला मुलीने आपल्या आई-वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी संपूर्णपणे अभ्यासात समर्पण केले पाहिजे.असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्नांना निलेश पाटील यांनी उत्तरे दिली तसेच कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे येथील विविध कोर्सेस अभ्यासक्रम कॉलेजच्या विविध कार्यक्रमाबद्दल तसेच नवीन काळामध्ये इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमात होऊ घातलेल्या बदलांबाबत सविस्तर चर्चा केली. जयदीप पाटील यांनी प्रस्तावना व आभार मानले.फोटो कॅप्शन – खिलेश पाटील यांच्या एमएचटी-सीईटी परीक्षेतील यशाबद्दल सन्मान करताना जयदीप पाटील.सोबत डावीकडून नयना पाटील, पांडुरंग पाटील, विवेक साळुंखे