• Sun. Jul 6th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

यूनिगिफच्या ११व्या वार्षिक शैक्षणिक शिखर परिषदेचा यशस्वी समारोप.

Jun 30, 2025

Loading

यूनिगिफच्या ११व्या वार्षिक शैक्षणिक शिखर परिषदेचा यशस्वी समारोप.

मुंबई –(विशेष प्रतिनिधी उदय नरे)

‘द युनि ग्लोबल इंटेलेक्चुअल्स फाउंडेशन (यूनिगिफ)’च्या ११व्या वार्षिक शैक्षणिक शिखर परिषदेचा भव्य समारोप मुंबई येथील ‘नेशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’ येथे पार पडला. सृष्टी फाउंडेशन आणि एम.व्ही. हाय स्कूल यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेने शिक्षण क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ, धोरणकर्ते, शिक्षक आणि उद्योग क्षेत्रातील जाणकारांना एकत्र आणून ज्ञानविनिमयाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

ॲड. आशीष शेलार – माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री

प्रेम शुक्ला – राष्ट्रीय प्रवक्ता, भारतीय जनता पक्ष

निदा चौधरी (IAS) – संचालक, एनजीएमए, भारत सरकार हे मान्यवर उपस्थीत होते.

🔷 शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी सन्मान:

या कार्यक्रमात महाराष्ट्रातील २०० हून अधिक शाळा प्रमुखांना “महाराष्ट्र रत्न सन्मान २०२५” या पुरस्काराने गौरविण्यात आले.

🔷 चर्चेतील महत्त्वाचे विषय:

शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) प्रभाव: क्रांती की आव्हान?

२१व्या शतकातील कौशल्य विकासासाठी शिक्षकांची बदलती भूमिका.
या महत्त्वपूर्ण विषयावर उहापोह परिषदेत करण्यात आला.

🔷 उपस्थित अन्य शिक्षणतज्ज्ञ:

रचना भीमरजका – अध्यक्षा
बिपिन गुप्ता – अध्यक्ष, सृष्टी फाउंडेशन, रोहन भट्ट सर,
दीपा भूषण, सुमन मेहता, सुभाष केडिया, प्रा. डॉ. अजय साहिब, व्ही. के. जैन, डॉ. एम. एल. सराफ, गणपत कोठारी
या सर्व मान्यवरांनी आपली मोलाची मते, अनुभव कथन केले. आणि विचारमंथनाद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या शिखर परिषदेन शिक्षण क्षेत्रातील भविष्यासंदर्भात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकत एक सकारात्मक आणि विचारप्रवर्तक मंच सिद्ध केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed