सावित्रीबाई फुले विद्यालयातील महिला नेतृत्वसमृद्ध कर्तृत्वाची सांगता..
प्राचार्या सौ. गायत्री भदाणे मॅडम यांचा सेवानिवृत्ती विशेष गौरव
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर, ३० जून २०२५ –
आज सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या मा. सौ. गायत्री चंद्रकांत भदाणे मॅडम या आपल्या ३२ वर्षांच्या तेजस्वी, कर्तृत्वशील आणि विद्यार्थीप्रिय शैक्षणिक प्रवासाची यशस्वी सांगता करत सेवानिवृत्त झाल्या. ही केवळ सेवानिवृत्ती नव्हे, तर एका प्रेरणादायी अध्यायाची गौरवशाली सांगता होती.
गायत्री मॅडम यांचा प्रवास शिक्षिकेपासून प्राचार्या पदापर्यंतचा होता, पण त्याहूनही मोठा होता तो – विद्यार्थिनींच्या जीवनात शिक्षणाचा उजेड पेरणाऱ्या “दीपशिखेचा” प्रवास. त्यांनी असंख्य गरजू, होतकरू विद्यार्थिनींना उभं करण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. “उपेक्षितांना जवळ आणणं आणि होतकरूंना उभं करणं” हे त्यांचं कार्यब्रीद त्यांच्या प्रत्येक कृतीतून जाणवत राहिलं.
घरातून लाभलेली मूल्यांची शिदोरी
शिक्षण आणि समाजसेवेची बीजं त्यांना घरातूनच लाभले होते.वडील: प्रसिद्ध वकील होते.आई: रा.वि. संस्था, चाळीसगावच्या संचालिका तर भाऊ: नामवंत चार्टर्ड अकाउंटंट पती: मा. श्री. चंद्रकांत भदाणे – चेअरमन, वत्साई एज्युकेशन सोसायटी,सासरे: निवृत्त ADI,कन्या: कु. मनस्वी – MBBS शिक्षणात प्रगतीपथावर आहे. सौ गायत्री भदाने यांनी आपल्या परिवाराला शिक्षणाचे योग्य बाळकडू दिले, संस्कार दिले, आजही अमळनेर तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात भदाणे कुटुंब यांचा नावलौकिक आहे..
सौ भदाणे या संस्थात्मक व सामाजिक कार्याचा वटवृक्ष म्हणजे त्या सचिव – वत्साई एज्युकेशन सोसायटी,सचिव – पर्ल इंटरनॅशनल स्कूल व ITI,माजी संचालक – साने गुरुजी माध्यमिक पतपेढी,सचिव – सावित्रीबाई महिला ज्येष्ठ नागरिक संघ,जिल्हा गाईड ADC – उल्लेखनीय सेवा आहे. त्यांनी अध्यापन करत असतांना गुणवत्तेशी कधीही तडजोड केली नाही. विद्यार्थी व संस्थेच्या हितासाठी नेहमीच कार्य करत राहिल्या ..सेवानिवृत्ती निमित्ताने सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.. त्यांच्या संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ संस्थेचे सर्व प्रशासन अधिकारी,प्राचार्य, मुख्याध्यापक ,शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांच्या कार्याचा गुणगौरव भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या.त्यांनी शाळा, संस्था, समाज आणि विद्यार्थिनी या सगळ्यांचं आपुलकीनं आणि जबाबदारीनं मार्गदर्शन केलं.
सेवानिवृत्ती समारंभ – स्नेहाचा आणि सन्मानाचा दिवस होता..सेवानिवृत्ती समारंभ सौहार्दपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. प्रा. सुनील गरुड सर (मानद शिक्षण संचालक, नवलभाऊ प्रतिष्ठान) यांनी त्यांच्या कार्याचा समग्र आणि भावस्पर्शी आढावा घेतला. त्यांनी मॅडम यांना पुढील जीवनासाठी सुख, समाधान आणि उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात अनेक मान्यवर, शिक्षकवृंद, सहकारी, हितचिंतक आणि विद्यार्थिनींनी आपली उपस्थिती दर्शवून मॅडम यांना मनःपूर्वक अभिनंदन केले.
उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये: आबासाहेब डी. बी. पाटील, प्रा. श्याम पवार सर,वत्साई एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. चंद्रकांत भदाणे, जळगाव ग.स पतपेढीचे माजी उपाध्यक्ष आबासाहेब शामकांत भदाने,सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस. डी. देशमुख सर, साने गुरुजी कन्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका
अनिताताई बोरसे मॅडम, मंगरूळ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य प्रकाश पाटील सर, साई इंग्लिश अकॅडमी चे संचालक भैय्यासाहेब मगर व सो एडवोकेट मगर मँडम,गोसावी सर, सुनील पाटील सर, प्रा.शेख सर, व्हाईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष पत्रकार उमेश काटे सर, सहसचिव ईश्वर महाजन सर, साने गुरुजी वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, देवदत्त संदानशिव, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता.
.सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक श्री सुनील वाघ सर व आभार प्रदर्शन श्री दिपक कुमार पाटील सर यांनी केले. तर यावेळी सावित्रीबाई फुले माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व नवलभाऊ प्रतिष्ठानचे कर्मचारी उपस्थित होते..