• Fri. Jul 4th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

बीड येथे विद्यार्थिनीवरील लैंगिक छळप्रकरणी कठोर कारवाई करा”* *विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विशेष मागणी*

Jun 30, 2025

Loading

*”बीड येथे विद्यार्थिनीवरील लैंगिक छळप्रकरणी कठोर कारवाई करा”*

*विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची विशेष मागणी*

बीड, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : बीड येथील एका खासगी कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक छळाच्या धक्कादायक घटनेची गंभीर दखल घेत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांना पत्र पाठवून तत्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

डॉ. गोऱ्हे यांनी या प्रकरणाला संतापजनक आणि समाजाला हादरवून टाकणारे म्हटले असून, अल्पवयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत हे गंभीर प्रश्न उपस्थित करणारे असल्याचे स्पष्ट केले आहे. शिक्षणाच्या उद्देशाने कोचिंग क्लासमध्ये गेलेल्या मुलीवर असे अत्याचार होणे हे कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी लज्जास्पद असून, अशा घटकांना वेळीच थांबवणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या.

या प्रकरणात संबंधित विद्यार्थिनीने धैर्याने पुढे येत पोलिसांकडे तक्रार दिली असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तसेच, अशा प्रकरणांमध्ये त्वरित न्यायप्रक्रिया आणि कठोर कायदेशीर कारवाई आवश्यक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले आहे.

त्यांनी आरोपींविरुद्ध कठोर कारवाई आणि जलद न्यायप्रक्रिया सुरू करणे, पीडित विद्यार्थिनीला मानसिक, कायदेशीर आणि सामाजिक आधार देणे, बीड जिल्ह्यातील तसेच इतर खासगी कोचिंग क्लासेसची सुरक्षिततेच्या दृष्टीने तपासणी करणे, तसेच अशा संस्थांमध्ये ठोस आचारसंहिता व प्रतिबंधात्मक उपायांची प्रभावी अंमलबजावणी करणे या बाबींवर तातडीने कार्यवाही करण्याचा आग्रह धरला आहे.

“या प्रकरणाकडे ‘शून्य सहनशीलता’च्या दृष्टिकोनातून पाहून तत्काळ कारवाई व्हावी, अशी जनतेचीही अपेक्षा आहे. महिला सुरक्षेच्या दृष्टीने शासन आणि पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलली पाहिजेत,” असे स्पष्ट मत उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *