*अधिवेशनाच्या प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्रीमंडळातील सदस्यांकडून सभापती-उपसभापतींना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा*
मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या प्रारंभी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा राज्य शासनातील मान्यवर मंत्र्यांनी सन्मान केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही पुष्पगुच्छ देत सभापती आणि उपसभापती यांना औपचारिक शुभेच्छा दिल्या.
या वेळी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई तसेच विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते. या औपचारिक आणि सौहार्दपूर्ण भेटींमुळे अधिवेशनाच्या सुरुवातीलाच सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
या प्रसंगी उपस्थित सदस्यांनी अधिवेशनातील आगामी कामकाज रचनात्मक, शिस्तबद्ध आणि सुसंवादात्मक पद्धतीने पार पडावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.