• Sat. Jul 5th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

लोकस्वातंत्र्य ही अनेकांना सन्मान ,संधी आणि न्याय देणारी पत्रकार संघटना– प्रा.डॉ.संतोष हुशे* *लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ४६ वा मासिक विचारमंथन मेळावा संपन्न….महपुरूषांना अभिवादन,बळींना श्रध्दांजली*

Jul 1, 2025

Loading

*लोकस्वातंत्र्य ही अनेकांना सन्मान ,संधी आणि न्याय देणारी पत्रकार संघटना– प्रा.डॉ.संतोष हुशे*

*लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ४६ वा मासिक विचारमंथन मेळावा संपन्न….महपुरूषांना अभिवादन,बळींना श्रध्दांजली*

*अकोला* – लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ ही संपूर्ण महाराष्ट्रभर विस्तारलेली आणि पाच राज्यात पोहचलेली समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना आहे.हा एकखांबी तंबू नाही तर अनेकांना सन्मान,समान संधी आणि पत्रकार व समाजाला न्याय देणारी समाजाभिमुख राष्ट्रीय संघटना आहे.आजच्या बिघडलेल्या वास्तव परिस्थितीचा विचार करून संघटनेतील आणि ईतर पत्रकारांनी कोणी म्हणते तसे नव्हे,तर स्वत:ला जे दिसते आणि वाटते त्याप्रमाणे आपल्या दमदार लेखणीतून लिहिले पाहिजे.असे चिंतनशील प्रतिपादन प्रा.डॉ.संतोषभाऊ हुशे यांनी केले.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचा ४६ वा मासिक विचारमंथन मेळावा स्थानिक जठारपेठेतील जैन रेस्ट्रो येथे संपन्न झाला.त्यावेळी ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.याप्रसंगी शैक्षणिक,सामाजिक सेविका,तथा राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस मंदाताई देशमुख, नागपूरच्या महाराष्ट्र राज्य शहर व ग्रामीण पत्रकार संघ व माहिती अधिकार हक्क मंचाचे संस्थापक- अध्यक्ष राजेश ठाकूर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष- संजय एम.देशमुख, पदाधिकारी सिध्देश्वर देशमुख,लोकस्वातंत्र्य अकोला जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर यांची विचारमंचावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सर्वप्रथम संघटनेचे सामाजिक अधिष्ठाण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,कर्मयोगी संत गाडगे बाबा यांना वंदन,अभिवादन करण्यात आले.देशातील शहिद जवान,विमान दुर्घटनेतील बळी,अत्त्याचारातील महिला बळी,आत्महत्त्याग्रस्त शेतकरी,आपत्ती व अपघात बळी व दिवंगत पत्रकारांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.पदाधिकारी सन्मान आणि दिपक शर्मा यांची जिलवहा संघटन- संपर्क प्रमुख नियुक्तीची घैषणा नियुक्तीपत्रे व ओळखपत्रे वितरीत करण्यात आली.अतिथींचे सन्मानचिन्ह,शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आले.याप्रसंगी मंदाताई देशमुख आणि राजेश ठाकूर यांनीही संघटनेच्या वाटचालीचा गौरव करून आगामी प्रवासाला शुभेच्छा व्यक्त केल्या.लोकस्वातंत्र्य अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी संघटनेच्या मागण्यांना शासनाकडून प्रतिसाद मिळून येत असलेल्या यशाची माहिती दिली.पत्रकार कल्याणाच्या योजनामध्ये संघटनेने सुचविलेल्या व मुख्यमंत्री तथा महासंचालकांना पाठविलेल्या निवेदनाचे वाचन केले.
याप्रसंगी राष्ट्रीय सचिव राजेन्द्र देशमुख, उपाध्यक्ष,प्रदिप खाडे,पदाधिकारी पुष्पराज गावंडे,अंबादास तल्हार,सौ.जया भारती,इंगोले,संदिप देशमुख, प्रा.मोहन काळे, अनंतराव देशमुख,डॉ.विनय दांदळे,के‌.एम.देशमुख,सागर लोडम,गौरव देशमुख,सुरेश पाचकवडे, प्रा.विजय काटे, संजय कृ.देशमुख,सुरेश तिडके,अनिल मावळे,अॕड.मुरलीधर इंगळे,नानासाहेब देशमुख,विजयराव बाहकर, शामराव देशमुख, वसंतराव देशमुख,सौ.दिपाली बाहेकर,सौ.यशोदा गव्हाळे,मनोहर मोहोड,विजय देशमुख, निर्मल पिटर,अनंतराव महल्ले,सतिश देशमुख ( विश्वप्रभात),गजानन मुऱ्हे,नरेन्द्र देशमुख,
रमेश समुद्रे, श्याम देशमुख,बुढन गाडेकर,अजय वानखडे,संतोष मोरे, व अनेक पत्रकार पडत्या पाऊसातही उपस्थित होते. संचलन सौ.जया भारती इंगोले तर आभारप्रदर्शन सौ.दिपाली बाहेकर यांनी केले.स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
==========================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *