उद्योगाचे सामाजिक उत्तरदायित्व अर्थात सी एस आर चे विकसित भारत करण्यासाठी महत्वाचे योगदान -प्राचार्य डॉ विष्णू गुंजाळ
अमळनेर प्रतिनिधी
कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी
Corporate Social Responsibility
पुस्तक प्रकाशन प्राचार्य डॉ विष्णू गुंजाळ यांच्या हस्ते प्रकाशन करणेत आले.
उद्योगांचे सामाजिक उत्तरदायित्व या विषयावर अमळनेर येथील श्रम सापडले एज्युकेशन सोसायटी संचलित समाजकार्य महाविद्यालयातील प्रा विजयकुमार वाघमारे यांची कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या विषयावरचे पुस्तक प्रकाशन डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे जिल्हा धुळे येथील प्राचीन प्राचार्य डॉ विष्णू गुंजाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्योगाचे सामाजिक उत्तरदायित्व हा विषय सध्या समाजकार्यामध्ये अतिशय महत्वपूर्ण असल्याने याबाबत परिपूर्ण असा माहितीचा दस्तऐवज सदर पुस्तकामध्ये असल्याने विद्यार्थी शिक्षक व अभ्यासक यांना उपयुक्त होईल असे प्रकाशन प्रसंगी प्राचार्य डॉ विष्णू गुंजाळ यांनी सांगितले
प्रकाशन समारंभ दरम्यान प्रा धनराज ढगे प्रा डॉ सुदाम राठोड सहकारी प्राध्यापक यांची उपस्थिती होती.