‘विद्यार्थी शेताच्या बांधावर’ —ग्लोबल मिशन स्कुलचा प्रेरणादायी कृषी दिन
जळगांव प्रतिनिधी
बाहुटे ( ता पारोळा) येथे आज रोजी तालुक्यातील अल्पावधीत नावारुपाला आलेली शाळा ग्लोबल मिशन स्कुल बाहुटे यांनी कृषी दिन उत्साहात साजरा केला. कृषी दिनाचे औचित्य साधत “विद्यार्थी शेताच्या बांधावर”उपक्रम राबविला.
बाहुटे येथील प्रगतिशील शेतकरी श्री खंडेराव पाटील यांना ग्लोबल मिशन स्कुल च्या विद्यार्थ्यांनी शेती,खत नियोजन,बियाणे, फवारणी अनेक प्रश्न विचारुन शेती व्यवसाय बाबत माहिती जाणून घेतली.
याप्रसंगी प्रतिक्रिया देताना संस्थेचे चेअरमन मनोहर पाटील म्हणाले की “भारत हा कृषिप्रधान देश आहे .भारतातील प्रत्येक विद्यार्थ्याला कृषी या विषयाबद्दल आत्मीयता असली पाहिजे .कृषी क्षेत्राबद्दल चिमुकल्यांना माहिती मिळावी तसेच मुलांना आई-वडिलांच्या कष्टांची जाणीव असावी म्हणून हा उपक्रम राबवताना आनंद झाला”
यावेळी प्रमुख उपस्थिती शाळेचे चेअरमन श्री मनोहर पंडीत पाटील ,सर प्राचार्य उमाकांत बुंदेले सर ,उप प्राचार्य
उज्वला पाटील जेष्ठ मार्गदर्शक प्रा एस जे पाटील ,सर जय सर राहुल सर तसेच
डालसन्स क्राॅप सायन्स कंपनी प्रतिनिधी राजेंद्र शर्मा सर हजर होते .
कार्यक्रमाच्या शेवटी शेतकरी खंडेराव पाटील यांचे आभार
प्राचार्य उमाकांत बुंदेले सर यांनी मानले