• Sat. Jul 5th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त’ कंडारी गावातील ग्रामपंचायत कार्यालय येथे मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

Jul 1, 2025

Loading

‘राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त’ कंडारी गावातील ग्रामपंचायत कार्यालय येथे मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न.

जळगाव प्रतिनिधी
दि. ०१/०७/२५, मंगळवार रोजी,श्री. चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व श्री. पी. ई. तात्या पाटील हॉस्पिटल यांच्या मार्फत कंडारी गावातील ग्रामपंचायत कार्यालय येथे “राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त” मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान कंडारी गावातील ग्रामस्थांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घेतला.यावेळी डॉ. सिद्धेश्वर पाटील यांनी रुग्णांची आरोग्य तपासणी केली तसेच नेत्र तपासणी डॉ. जयेश वाल्हे यांनी केली. या सर्व रुग्णांना मोफत होमिओपॅथी औषधी देण्यात आली तसेच मोतीबिंदू असलेल्या रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच शिबिरात आलेल्या रुग्णांना डॉक्टरांनी मोफत मार्गदर्शन केले.तसेच श्री.चामुंडामाता होमिओपॅथी महाविद्यालयात तज्ञ-डॉक्टरांकडून शारीरिक व मानसिक सर्व प्रकारच्या, हाडांचे आजार, त्वचारोग, मेंदू व मणक्याचे आजार, पोटाचे विकार, वंध्यत्व, त्याचे विकार, मूत्ररोग, स्त्री रोग अश्या सर्व आजारांवर मोफत उपचाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपस्थित डॉक्टरांनी रुग्णांना केले. रक्त तपासणी श्री. आकाश सोनवणे यांनी केली. कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टर्स यावेळी उपस्थित होते.

श्री.चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष मा.श्री. पी. ई. तात्या पाटील, सचिव मा. राहुल पाटील सर,प्राचार्य. डॉ.सुधांशू सिंग, रुग्णालय अधीक्षक डॉ.नरेंद्र शर्मा, यांच्या मार्गदर्शनाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

कंडारी गावातील सरपंच सौ. यशोदाबाई सोनवणे वं ग्रामपंचायत मधील इतर सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी श्री.नवल परदेशी यांनी मेहनत घेतली.

तसेच प्रत्येक महिन्याला मोफत आरोग्य तपासणी करून देण्याचे आश्वासन श्री.चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज त्यांच्याकडून देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *