
सरकारी जमिन विकणाऱ्या भुमाफियांविरूध्दच्या कारवायांमध्ये लोकस्वातंत्र्यच्या परभणी पदाधिकाऱ्यांना यश !* * *लोकस्वातंत्र्य पत्रकारमहासंघाचे युसूफ आणि वाजीद पठाण यांच्या उपोषणाची शासनाकडून त्वरीत दखल*
*सरकारी जमिन विकणाऱ्या भुमाफियांविरूध्दच्या कारवायांमध्ये लोकस्वातंत्र्यच्या परभणी पदाधिकाऱ्यांना यश !*
* *लोकस्वातंत्र्य पत्रकारमहासंघाचे युसूफ आणि वाजीद पठाण यांच्या उपोषणाची शासनाकडून त्वरीत दखल*
*अकोला* – शासकीय जमिनींवर ताबे करून परस्पर विक्री करीत विल्हेवाट लावणाऱे भुमाफिये आणि महसूल विभागाचे अनेक भ्रष्टाचारी अधिकारी कर्मचाऱ्यांविरूध्द लोकस्वातंत्र्य पत्रकार सहासंघ सक्रिय असून अशा दोन कारवायात मंत्रालयातून कारवाईचे आदेश मिळवण्यात वाजीद पठाण आणि युसूफ पठाण हे परभणीचे दोन पदाधिकारी यशस्वी झालेले आहेत.
परभणी जिल्ह्यात सेलू शहरातील शेत सर्व्हे क्र.१९ आणि २० मधील एका कंपनीकडून शासनाने जप्त केलेल्या जमिनीची संबंधित तलाठी आणि काही महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताने विक्री करून परस्पर विल्हेवाटीचे मलिदेखाऊ कारनामे काही भुमाफियांनी सुरू केलेले होते.यासंबंधी जिल्हा आणि तालूका पातळीवरील अधिकाऱ्यांकडे तक्रारी करून सुध्दा या प्रकरणामध्ये हेतूपुरस्सर कारवाया टाळल्या जात होत्या. याप्रकरणी उच्च पातळीवरून न्याय मिळवण्यासाठी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे पदाधिकारी युसूफ पठाण आणि डिजीटल मिडीयाचे मराठवाडा विभागीय संघटन संपर्क वाजीद पठाण यांनी दि.२४ जून २०२५ रोजी आझाद मैदान मुंबई येथे उपोषणाला सुरूवात केली होती.याबाबत लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय देशमुख यांनी सुध्दा या उपोषणाची मुख्यमंत्र्यांना माहिती देऊन या प्रकरणी कारवाईची मेलव्दारे मागणी केली होती.आझाद मैदानावर त्यांनी आपले सहकारी राज्य पदाधिकारी अरविंदराव देशमुख,पुष्पराज गावंडे यांचेसह उपोषणकर्त्या पठाण बांधवांना भेट दिली होती. यापूर्वी सुध्दा एका २५ लाख अपहाराच्या प्रकरणात या दोन पदाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश प्राप्त करण्याचे यश मिळविलेले आहे.त्यांच्या या आक्रमक धडक कारवायांबध्दल परभणी जिल्ह्यातील. सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
महसूल आणि गृहविभागाच्या सचिवांनी या प्रकरणाची दुसऱ्याच दिवशी ताबडतोब दखल घेऊन परभणी प्रशासनातील पोलिस आणि महसूल अधिकाऱ्यांना याप्रकरणी गुन्हे नोंदवून कारवाया करण्याचे दि.२५ जून २०२५ च्या पत्रातून आदेश दिलेले आहेत. लोकस्वातंत्र्यच्या अनेक मागण्यांची आणि पदाधिकाऱ्यांच्या उपोषणाची शासनाकडून योग्य वेळी दखल घेतली जात आहे.त्याबध्दल लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त केले आहेत.