
पत्रकार प्रमोद अशोकराव अंभोरे हे परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित
पत्रकार प्रमोद अशोकराव अंभोरे हे परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित
परभणी ( प्रतिनिधी ): लोकशाही उत्सव असलेल्या सार्वत्रिक लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या २०२४ मध्ये यशस्वी अंमलबजावणीसाठी परभणी जिल्ह्यातील विविध माध्यमांतील पत्रकारांनी दिलेल्या योगदानाबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे (भा. प्र. से.) यांनी प्रशस्तीपत्रक देत त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. यामध्ये लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ चे परभणी जिल्हाकार्याध्यक्ष पत्रकार प्रमोद अशोकराव अंभोरे (संपादक समाजहितासाठी बंड तथा समाजहित न्यूज) यांना विशेष उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती, तटस्थ बातम्यांच्या माध्यमातून समाजात विश्वास निर्माण करणे, तसेच निवडणूक आयोगाच्या सूचना वेळच्यावेळी पोहोचवणे या सर्व बाबींमध्ये त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले, असे प्रशस्तीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. प्रशस्तीपत्रकात पुढे असेही नमूद करण्यात आले आहे की, “आपल्या तांत्रिक कौशल्याचा आणि पत्रकारितेतील नैतिकतेचा प्रभावी वापर करून, निवडणूक आयोगाच्या नियोजनास मदत झाली असून, लोकशाही मूल्यांचे संवर्धन करण्यात आपली भूमिका महत्त्वाची ठरली आहे.”
लोकसभा निवडणुका २०२४ या २५ व्या वर्षीच्या पार्श्वभूमीवर पार पाडताना सर्व संबंधित यंत्रणांचे मोलाचे सहकार्य लाभले. यामध्ये पत्रकारांनी बजावलेल्या भूमिकेची जिल्हा प्रशासनाने घेतलेली दखल महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी श्री. रघुनाथ गावडे यांनी प्रमोद अशोकराव अंभोरे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत, त्यांचे अभिनंदन केले आहे. हा सन्मान झाल्यामुळे पत्रकार प्रमोद अशोकराव अंभोरे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. यावेळी परभणी जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी ढालकरी मॅडम, परभणी जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद घोंगडे, जिल्हा माहिती अधिकारी बारहाते साहेब, गजानन शिंदे आदींची उपस्थिती होती.