सर्वसमावेशक मानवसेवी उपक्रमातूनच सामाजिक सद्भाव निर्माण होईल- पत्रकार संजय एम.देशमुख*  *राईट वे फाउंडेशनचा मस्जिद परिचय सद्भावना कार्यक्रम संपन्न*
1 min read

सर्वसमावेशक मानवसेवी उपक्रमातूनच सामाजिक सद्भाव निर्माण होईल- पत्रकार संजय एम.देशमुख* *राईट वे फाउंडेशनचा मस्जिद परिचय सद्भावना कार्यक्रम संपन्न*

Loading

*सर्वसमावेशक मानवसेवी उपक्रमातूनच सामाजिक सद्भाव निर्माण होईल- पत्रकार संजय एम.देशमुख*

*राईट वे फाउंडेशनचा मस्जिद परिचय सद्भावना कार्यक्रम संपन्न*

*अकोला* – धार्मिकता आणि सामाजिकता ह्या दोन्ही भिन्न गोष्टी असून मानवी समुहाचे कल्याण आणि उत्थानासाठी वेगवेगळ्या धर्मांची निर्मिती आहे.धर्म हा आचरणासाठी असून त्यातील मानवतावादाच्या सत्यानुसार सर्व जाती धर्मांच्या सर्वसमावेशक सहभागाने प्रत्यक्ष सेवाभावी सामाजिक उपक्रम निरंतर राबवित राहिल्यानेच मोठ्या प्रमाणात खरा सामाजिक सद्भाव निर्माण होऊ शकतो.असे मानवतावादी प्रतिपादन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांनी केले.

अकोला येथील मोमीनपूरा मस्जिदमध्ये राष्ट्रीय एकात्मता मस्जिद परिचय सद्भावना स़मेलनाचे आयोजन‌ राईट वे फाउंडेशनने केले होते.त्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावर राईट वे चे अध्यक्ष हाजीद सज्जाद हुसैन तर प्रमुख वक्ते म्हणून मौलाना मुहम्मद ईस्माईल कासमी (लातूर) हे होते. त्यांनी विविध धार्मिक आणि सामाजिक विषयावर माहिती दिली.मस्जिद ही व्देष नव्हे तर प्रेम आणि माणुसकीचा संदेश देणारे ठीकाण आहे.इस्लामविषयी पसरलेल्या गेरसमजांना दुर करून संवाद आणि समजुतीच्या माध्यमातून एकात्मतेचा संदेश देणे हे राईट वे फाऊंडेशनचे कार्य असल्याचे अध्यक्ष हाजी सज्जाद हुसैन यांनी याप्रसंगी सांगीतले.जहूर सर यांनी प्रास्ताविकातून मस्जिद परिचय दिला.
इस्लाम म्हणजे शांती समर्पण असून हा धर्म न्याय ,करूणा व समानतेवर आधारीत आहे.मस्जिद ही केवळ नमाजासाठी नसून ते शिक्षण,सेवा आणि सौदार्ह्याचे ठीकाण असल्याचे यावेळी विविध वक्त्यांनी स्पष्ट केले.इस्लामची मुलभूत तत्वे आणि कुराणातील मानवतेच्या तत्वांवर प्रकाशझोत टाकला. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार दिनेश शुक्ल व अॕड सुधाकर खुमकर यांनी सुध्दा मनोगते व्यक्त केली.

या सद्भावना संमेलनाला राजीव पिसे,अनिल माहोरे,प्रबोध देशपांडे,जयेश जग्गड,धनंजय साबळे,लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर,सचिव मनोहर मोहोड,रमेश समुद्रे,दिपक सिरसाट एजाजभाई, फुलचंद वानखेडे ईतर अनेक पदाधिकारी,अकोला शहरातील ज्येष्ठ व ईतर बहूतांश पत्रकार, डीजीटल, वृत्तवाहिण्यांचे व अनेक वृत्तपत्रांचे प्रतिनिधी,संघटना पदाधिकारी उपस्थित होते.सर्वांचे राईट वे फाऊंडेशन व मस्जिद व्यस्थापनाकडून स्वागत करण्यात आले. यावेळी इस्लाम आणि मस्जिद संदर्भातील माहितीपूर्ण साहित्य सर्वांना भेट देण्यात आले.अध्यक्ष हाजी सज्जाद हुसैन यांनी समारोपीय भाषणातून उपस्थित पत्रकार व सर्वांप्रती आभार व्यक्त केले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी राईट वे फाउंडेशनचे अॕड.अफजल गाझी,अमिन सर,मोहम्मद सलिम,अब्दुल हादी,अंजार हुसैन, सादिक अली,वसिम अहमद खान,बुढन गाडेकर,औरंगजेब हुसैन, डॉ.जाकीर अली,अजहर हुसैन मुतावल्ली,मस्जिद प्रशासन,व स्वयंसेवकांचे विशेष योगदान लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *