
राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष अजित शिंदे यांची कर्मभूमी स्मारकाला भेट; तरुणाईला दिली पुढाकार घेण्याची प्रेरणा”
“राष्ट्र सेवा दलाचे अध्यक्ष अजित शिंदे यांची कर्मभूमी स्मारकाला भेट; तरुणाईला दिली पुढाकार घेण्याची प्रेरणा”
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. अजित शिंदे यांनी अलीकडेच अमळनेर येथील साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी स्मारकाच्या कार्याचा आढावा घेतला आणि तरुण पिढीला सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारे मार्गदर्शन केले.
“खान्देशचे बलस्थान म्हणून ओळख असलेल्या कर्मभूमी स्मारकाचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी तरुणांच्या पाठीशी उभे राहून त्यांना ताकद द्यावी,” असे विचार मा. शिंदे यांनी व्यक्त केले. या प्रसंगी त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत एक वडाचे झाड लावले. “या वटवृक्षासारखी सावली आपण तरुणाईसाठी निर्माण करू,” अशी आश्वासक भावना त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे स्वागत प्रा. अरविंद सराफ यांच्या हस्ते करण्यात आले, तर त्यांना शुभम पवार, चेतन सोनार, मिलिंद वैद्य आणि इतर तरुण कार्यकर्त्यांनी साथ दिली.
गोपाळ नेवे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.
धुळे येथून आलेल्या राष्ट्र सेवा दलाच्या सहकाऱ्यांचे स्वागत रोहित पाटील, लोकेश वाणी, शिव निकम, हेमंत साळुंखे, नाविण्य पाटील, प्रथमेश चौधरी, अभय वाघमोडे, विक्रांत शेजवल, तुषार पाटील, आणि आश्विनी वाघमोडे यांनी गुलाबफुल व पर्यावरण संतुलनासाठी कापडी पिशव्यांचे वितरण करून केले.
या कार्यक्रमास साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाचे पदाधिकारी, हितचिंतक, कार्यकर्ते, पालक व विश्वस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा दौरा केवळ एक औपचारिक भेट न राहता, तरुणांना प्रेरणा देणारा ठरला.