
अमळनेरमध्ये धान्य घोटाळा! शिवसेनेच्या तालुका प्रमुखाचा पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासा अमळनेरात दोन रेशन दुकाने कायम बंद; आणखी सहा जाळ्यात येणार?”
अमळनेरमध्ये धान्य घोटाळा! शिवसेनेच्या तालुका प्रमुखाचा पत्रकार परिषदेत धक्कादायक खुलासा
अमळनेरात दोन रेशन दुकाने कायम बंद; आणखी सहा जाळ्यात येणार?”
अमळनेर प्रतिनिधी
स्वस्त धान्य पुरवठा योजनेत घोटाळ्याचा मोठा पर्दाफाश झाला आहे. शिवसेना तालुका प्रमुख सुरेश अर्जुन पाटील यांनी पत्रकार परिषदेत सन २०१८ पासून चालू असलेल्या बनावट संस्थांच्या नावावरून चालणाऱ्या बोगस स्वस्त धान्य दुकानांवर जोरदार हल्लाबोल केला.
सुरेश पाटील म्हणाले की, महेंद्र बोरसे यांचे दहा रेशन दुकान असून त्यापैकी दोन दुकानांचा परवाना आधीच रद्द झाला आहे. उर्वरित दुकानांवरील बोगसपणाचा पुरावा मिळाल्यावर त्याचेही परवाने रद्द करण्यासाठी ते शासनाकडे तक्रार करणार आहेत. तसेच, संबंधित भ्रष्टाचार प्रकरण शासनाने गांभीर्याने घेत फौजदारी कारवाई होण्याची मागणीही त्यांनी केली.
शनिवार ११ जुलै २०२५ रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी रुपेश ब्रीजेवार यांनी या बनावट संस्थांचे रेशन दुकानांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याचा आदेश दिला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी राजे बहुउद्देशीय मंडळ, निर्मलाई फाउंडेशन, रेशिनिंग दुकान सात्री यांसारख्या संस्थांचा समावेश आहे.
श्री पाटील म्हणाले, “राजकीय दबावामुळे पूर्वी देखील परवाने पुनः मिळाले होते, पण आता शासनाचा निर्णय कठोर असून बोगस संस्थांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.”
याशिवाय, धर्मदायुक्तांनी काही बनावट संस्था तात्काळ रद्द केल्या असून अद्यापही अनेक ठिकाणी बनावट धान्य उचलल्याच्या घटनांची तज्वीद केली जात आहे. अखेर न्यायालयीन कारवाईसह शासकीय किमतीनुसार वसुलीही केली जाईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.
धान्य पुरवठा योजनेतील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी प्रशासन आणि शासन यांना या प्रकरणी त्वरित कृती करणे अत्यंत आवश्यक आहे, असे पत्रकार परिषदेत सुरेश अर्जुन पाटील, तालुका प्रमुख, शिवसेना, अमळनेर
जि. जळगाव यांनी म्हटले आहे.
चौकट
शिंदे गटाचे अमळनेर तालुकाप्रमुख व माजी सरपंच सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये रेशन दुकानातील भ्रष्टाचार संदर्भात केलेल्या आरोपाबद्दल महेंद्र बोरसे यांच्याशी
मराठी लाईव्ह न्युजच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता संपर्क झाला नाही .