
“कल्पकतेला विज्ञानाची जोड : झांबरे विद्यालयात विज्ञान मंडळाचे भव्य उद्घाटन”
‘विज्ञान मंडळाचे उद्घाटन उत्साहात पार पडले’
जळगाव : ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे दिनांक १९ जुलै २०२५ रोजी विज्ञान मंडळाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे मॅडम यांनी भूषवले ,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. सुशांत जगताप सर(चाळीसगाव)लाभले, कार्यक्रमासाठी बी एड कॉलेज चे उपप्राचार्य श्री केतन चौधरी सर,पर्यवेक्षक श्री नरेंद्र पालवे सर ,उपक्रमशील जेष्ठ शिक्षक श्री महेंद्र नेमाडे सर, उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी गायलेल्या प्रेरणादायी ‘विज्ञान गीत’ ने झाली. नंतर इ.6 ते 9 त शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी विज्ञान ओव्या म्हटल्या , अंतराळ विज्ञानाचे मॉडेल्स तयार केले व ते सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने आणि मेहनतीने तयार केलेले हे मॉडेल्स विज्ञानाच्या जगात त्यांच्या रुचीची आणि सर्जनशीलतेची साक्ष देत होते.
प्रमुख पाहुणे यांनी विद्यार्थ्यांना , चंद्रावरचे पहिले पाऊल कसे ठेवले आणि त्या अनुषंगाने भारताने अवकाशशास्त्र मध्ये कशी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ppt द्वारे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान विषयप्रमुख सौ पूनम कोल्हे यांनी केले तर सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सौ ज्योती पाचपांडे आणि खुशबू चौधरीमॅडम यांनी केले,प्रमुख पाहुण्यांचे परिचय सौ दीपाली खडकेमॅडम आणि आभार सौ नूतन वराडे मॅडम यांनी केले.कार्यक्रमासाठी सुंदर असे फलक लेखन शाळेचे शिक्षक श्री निर्मल चतुर सर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व विज्ञान शिक्षकांनी प्रयत्न केले.
प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक केले आणि विज्ञान मंडळाच्या पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.