
परिवर्धा येथील गुरुवर्य जी.एस.पाटील विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप. मानव सेवेच्या वसा घेतलेले डॉ. मनिलाल शिंपी हे हे खरे निस्वार्थी समाजसेवेचे उपासक आहेत: डॉ. किशोर आमोदकर .
परिवर्धा येथील गुरुवर्य जी.एस.पाटील विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप.
मानव सेवेच्या वसा घेतलेले डॉ. मनिलाल शिंपी हे हे खरे निस्वार्थी समाजसेवेचे उपासक आहेत: डॉ. किशोर आमोदकर .
*परिवर्धा, शहादा( प्रतिनिधी) गुरुवर्य जी . एस.पाटील माध्यमिक विद्यालय परिवर्धा ता. शहादा येथील विद्यालयात इ.पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वितरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत व शुभ हस्ते संपन्न झाला. महाराष्ट्र राज्य मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा संघटन या संस्थेअंतर्गत प्रमुख डॉक्टर मनिलाल शिंपी यांचा सहकार्याने व परिवर्धा येथील रुग्णांची अहोरात्र सेवा करणारे नामांकित डॉ.श्री.किशोरजी अमोदकर यांच्या सौजन्याने वह्या,पेन व पेन्सिल इ. साहित्याचे वाटप करण्यात आले. डॉ.किशोरजी अमोदकर यांच्या अध्यक्षतेखाली, व रस्ता सुरक्षा अभियान विभागीय नोडल ऑफिसर (समन्वयक अधिकारी) डॉ.मणिलाल शिंपी यांच्या प्रमुख उपस्थितीत,तसेच अखिल यावेळी अखिल भारतीय क्षत्रिय शिंपी समाजाचे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व तळागाळातील समाजाला एकत्रित करणारे संघटक विजयनाना बिरारी, अखिल भारतीय क्षत्रिय शिंपी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष वनेश खैरनार, श्री.मंगेश भामरे, संत नामदेव महाराज एज्युकेशन सोसायटीचे संचालक अंकुश शिंपी, शहादा येथील डॉ.तुषार सनसे, डॉ.शितल सनसे, मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा या ग्रुपचे प्रमुख डॉक्टर मनीलाल शिंपी यांचे वडील परिवर्धा येथील जेष्ठ समाजसेवक रतिलाल शिंपी आणि शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पाटील सर हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलित करून करण्यात आली. तसेच सर्व मान्यवरांचा मुख्याध्यापक जे.एस.पाटील यांच्या शुभहस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ.मनिलाल शिंपी यांनी मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचा उपक्रमांतर्गत सुरू केलेल्या कार्याचा उल्लेख केला. समाजातील विधवा स्त्रियांना शिलाई मशीन, शालेय विद्यार्थ्यांना सायकल व शैक्षणिक साहित्य वाटपाचा उल्लेख केला. त्यांनी इ.नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना कंपास भेट म्हणून दिल्या. डॉ.तुषार सनसे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी गळतीचे प्रमाण व अध्यापनाचे कार्य पाहता परिवर्धा येथील शाळेत विद्यार्थी हिताचे विविध उपक्रम व शिक्षकांची मेहनत याविषयी गौरवोद्गार काढून मला माझ्या लहानपणाच्या शाळेची आठवण झाल्यासारखे वाटते असे सांगितले. डॉ.शितल सनसे यांनी आपल्या मनोगतातून मी या शाळेची विद्यार्थिनी असल्याने स्वतःला भाग्यवान समजते कारण माझा शैक्षणिक पाया खऱ्या अर्थाने याच शाळेत पक्का झाल्याचे आपल्या मनोगतातून सांगितले. अखिल भारतीय क्षत्रिय शिंपी समाजाचे विश्वस्त विजयनाना बिरारी व अखिल भारतीय क्षत्रिय शिंपी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष वनेश खैरनार यांनीही आपल्या मनोगतातून शाळेत सुरू असलेल्या विद्यार्थी हिताच्या उपक्रमांचा व शालेय परिसराचा तसेच वर्गातील व वर्गाबाहेरील बोलक्या भिंती पाहून गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पाटील यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मिळालेली वही म्हणजे एक अमूल्य संधी आहे, ही केवळ कागदांची रचना नसून या वहीत अभ्यासाचे स्वप्न लिहिले तर यश निश्चितच मिळेल, आणि दात्यांनी ज्या हेतूने शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे त्यांच्या विश्वासास आपण निश्चितच पात्र ठरू असे सांगितले, तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणाऱ्या डॉ.किशोर आमोदकर व डॉ.मनिलाल शिंपी यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे अध्यक्ष दादासो डॉ.किशोरजी अमोदकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेणे का गरजेचे आहे हे सांगत असताना परिस्थितीचा बागुलबुवा न करता शिक्षणाने आपण परिस्थितीवर मात करू शकतो हे सांगितले. तसेच पावसाळ्याचे दिवस असल्याने आरोग्याची काळजी घेणे किती आवश्यक आहे हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. वरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील ज्येष्ठशिक्षक श्री.के.एन.पाटील यांनी केले, कलाशिक्षक एस.आर. मंगळे यांनी उपस्थित मान्यवरांचे मानले. या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर बंधू व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.*