
अमळनेरचा सन्मान! आयुक्त संदीप साळुंखे यांना “सर्वोत्तम सेवा पदक” प्रदान!
अमळनेरचा सन्मान!
आयुक्त संदीप साळुंखे यांना “सर्वोत्तम सेवा पदक” प्रदान!
अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)
अमळनेर तालुक्यातील मारवड गावाचे सुपुत्र आणि सध्या आयकर विभागात आयुक्तपदी कार्यरत असलेले श्री. संदीपकुमार साळुंखे यांना केंद्रीय अर्थमंत्रालयाचा सर्वोच्च राष्ट्रीय “सर्वोत्तम सेवा पदक” पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
दिनांक २४ जुलै २०२५ रोजी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित आयकर दिन कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांच्या हस्ते हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
पुरस्कार — “सर्वोत्तम सेवा पदक” आपल्या विकास मंचाचे सर्वेसर्वा आणि प्रेरणास्थान दादासो — श्री. संदीप कुमार साळुंखे साहेब यांनी एक ऐतिहासिक आणि गौरवशाली कामगिरी गाठली आहे!
देशभरातून केवळ १० अधिकाऱ्यांची या मानकरी यादीत निवड झाली होती. त्यात श्री. साळुंखे यांचा समावेश अमळनेरसाठी गौरवाची बाब ठरली आहे.
श्री. साळुंखे यांनी केवळ शासकीय सेवेतच नव्हे तर समाजकार्य, युवामार्गदर्शन आणि गावविकास क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केलं आहे. “मारवड विकास मंच” या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गावात विविध विकास प्रकल्प राबवले. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन सत्रे घेतली, तर अमळनेर शहरात अनेक प्रेरणादायी व्याख्यानांद्वारे युवकांमध्ये आत्मविश्वास जागवला.
त्यांच्या या कार्याची दखल घेत केंद्र सरकारकडून त्यांना हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
या यशाबद्दल अमळनेर तालुक्यातील राजकीय, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक ,पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी श्री. साळुंखे यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले असून, संपूर्ण तालुक्यात अभिमान आणि आनंदाचे वातावरण आहे.