
हिंदी अध्यापक मंडळाच्या वतीने तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचा 6 डिसेंबरला बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन…
अमळनेर प्रतिनिधी
14 सप्टेंबर राष्ट्रभाषा हिंदी दिवस निमित्ताने अमळनेर तालुका हिंदी अध्यापक मंडळ, पंचायत समिती शिक्षण विभाग अमळनेर व युनियन बँक ऑफ इंडिया शाखा शाखा शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय राष्ट्रभाषा हिंदी निबंध स्पर्धा 2022 चे आयोजन करण्यात आले होते . शहादा युनियन बँक शाखेचे प्रबंधक मयूर पाटील साहेब यांचे कार्यक्रमासाठी मोठे सहकार्य लाभले.
त
निबंध स्पर्धेण तालुक्यातून 2600 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.पारितोषिक वितरण समारंभ ६ डिसेंबर वार मंगळवार रोजी सकाळी 10 वाजता पूज्य साने गुरुजी माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी अमळनेर येथे कार्यक्रम होणार आहे. तरी अमळनेर तालुक्यातील सर्व हिंदी अध्यापक मंडळाचे बंधूभगिनी ,बक्षीसपात्र विद्यार्थी व उत्तेजनार्थ विद्यार्थी यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे अमळनेर तालुका हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे व सचिव दिलीप पाटील व सदस्य यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.