• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

तावखेडा ग्रामस्थांतर्फे रोहित पाटील, सैन्य दलात भरती झाल्याबद्दल नागरी सत्कार

Dec 2, 2022

Loading

तावखेडा ग्रामस्थांतर्फे रोहित पाटील, सैन्य दलात भरती झाल्याबद्दल नागरी सत्कार

शिंदखेडा तालुक्यातील तावखेडा,प,बे,दि 1 डिसेंबर रोजी तावखेडा गावात रोहित शशिकांत पाटील याचे इंडियन आर्मी मध्ये अग्नी वीर सैन्य दलात,सिलेक्शन झाल्याबद्दल शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मां सूनिल भाबड साहेब यांच्या हस्ते रोहितचा, पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी,माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दोंडाईचा मा.दिलीप संतोष पाटील व शशिकांत शालिग्राम पाटील यांच्याकडून शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील,भाबड यांच्या हस्ते,रोहितचा पाटील,सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक सुनील भाबड यांनी तरुणांनी नियमित व्यायाम वाचन जिद्द आणि चिकाटी, तसेच, निमित परीक्षेचा सराव व राष्ट्र सेवेसाठी तरुणांनी सैन्य भरतीसाठी पुढे येऊन, देश सेवेसाठी पुढे यावे या कामी आपल्याला काही गरज पडल्यास शैक्षणिक दृष्ट्या मदत करण्याचे आव्हान यावेळी पोलीस निरीक्षक बाभड यांनी तरुणांना मार्गदर्शन करताना सांगितले, यावेळीगावातील पोलीस पाटील डॉ.महेंद्र व्यास, विशाल माध्यमिक विद्यालयचे मुख्याध्यापक अरविंद माळी सर, पी. एच. साळुंखे सर व कस्तुराबाई आदिवासी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक पंकज पाटील सर व प्रवीण पाटील सर व दिपक पाटील सर विशाल साळुंके सर व वि. सोसायटीचे चेअरमन आप्पासो प्रताप पंजू पाटील गावातील डॉक्टर बाबासो डॉ शरद मोरे तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील व विजय पाटील ग्रामस्थांनकडून अण्णासो आनंदा खंडू जाधव,छोटूलाल पाटील, रंगराव जाधव,राजेंद्र पंजु पाटील, आण्णासो.युवराज दयाराम जाधव,सुनील पाटील, आनंदराव पाटील, विजय पाटील,धनराज निंबा पाटील,मुरलीधर पाटील ज्ञानेश्वर बच्छाव,धनराज पाटील व छत्रपती शिवराजे मित्र मंडळाच्या तरुणांकडून देखील रोहितचा सत्कार करण्यात आला व त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.आणि शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाबळ साहेब व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप पाटील विशाल माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक अरवींद माळी सर कस्तुराबाईआदिवासी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक पंकज पाटील सर व प्रवीण पाटील सर व विशाल साळुंके सर यांनी तरुणांसमोर प्रेरणादायी विचार मांडले आणि तरुणांना प्रोस्ताहन दिले.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *