
डॉ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा “आयडॉल ऑफ महाराष्ट्र 2022 कोकण रत्न पुरस्कार” देऊन सकाळ वृत्तपत्र समूहाकडून सन्मान.
ठाणे कल्याण ( मनिलाल शिंपी)::शैक्षणिक क्षेत्रात अहोरात्र मेहनत करणार्या डॉ. ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या कामाची दखल घेऊन दैनिक सकाळ वृत्तपत्र समूहाकडून श्रीयुत डॉ.ज्ञानेश्वर म्हात्रे यांना कोल्हापूर येथे सयाजी हॉटेल मध्ये सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी श्री डॉ.ज्ञानेश्वर म्हात्रे गेली 15 वर्षे सतत कार्य करत आहे. शिक्षण विभागातील नको असलेले कायदे, व त्यात आवश्यक असलेले बदल घडवून आणण्यासाठी सतत झटत आहेत. शिक्षकांवर होत असलेल्या अन्याया विरोधात 250 हून अधिक आंदोलनात आझाद मैदान येथे आपला सक्रिय सहभाग नोंदवला आहे. विना अनुदानित शाळांना अनुदान मिळवुन देण्यासाठी सरांनी वेळोवेळी घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे. हजारो शिक्षकांची निस्वार्थपणे सेवा केलेली असून, कोरोना काळात अनेक विनाअनुदानित शिक्षकांना आर्थिक मदत, गरजूंना आर्थिक मदत, सर्वांसाठी नेहमीच धावून जाणारे ,इतरांची समस्या आपली समस्या समजून सोडवणारे व्यक्तिमत्व म्हणुनच शिक्षण क्षेत्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना डॉ. ज्ञानेश्वर म्हात्रे हवेहवेसे व आपले वाटतात. सामाजिक कार्याबरोबर स्वतःच्या शाळेची गुणवत्ता संपादन केले असून शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू तयार केले आहेत, अनेक विद्यार्थ्यांना 8- 8 लाखो रुपयांचे पारितोषिक सुद्धा मिळालेले आहेत, राज्य शासनाकडून नामवंत “छत्रपती पुरस्कार ” दोन विद्यार्थ्यांना मिळाले आहेत, अनेक पदके पारितोषिक विद्यार्थ्यांना प्राप्त झाली आहेत, शाळेच्या कपाटात मावणार नाही एवढी पारितोषिक शाळेस प्राप्त झाली आहेत, या सर्वांची दखल सकाळ वृत्तपत्राने घेतली असून, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, शेती क्षेत्रामध्ये मध्ये विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींनाच या पुरस्काराने गौरविण्यात आले, डॉ.ज्ञानेश्वर म्हात्रे सरांनी केलेल्या शैक्षणिक कामाची ही पावतीच म्हणावी लागेल, अशी प्रतिक्रिया शिक्षक वर्गाकडून मिळत आहे.
आयडॉल ऑफ महाराष्ट्र2022″ म्हणून “कोकण रत्न पुरस्काराने” सन्मानित केल्याबद्दल डॉ.ज्ञानेश्वर म्हात्रे सरांचे खूप खूप अभिनंदन करण्यात येत आहे!