• Tue. Jul 8th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

संत अभंग प्रेरणेतून लोक स्वातंत्र्याचा वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ पालघर जिल्हा शाखेचा पर्यावरण उपक्रम!

Jul 8, 2025

Loading

संत अभंग प्रेरणेतून लोक स्वातंत्र्याचा वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ पालघर जिल्हा शाखेचा पर्यावरण उपक्रम!

पालघर (प्रतिनिधी) –पर्यावरण वाचवा , पृथ्वी सजवा, एक वृक्ष लावा, भविष्य घडवा ह्या सुविचाराप्रमाणे संत तुकाराम महाराजांच्या “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” अभंगातून प्रेरणा घेत लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ पालघर जिल्हा कमिटीच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या हेतूने आणि परिसर स्वच्छ, हिरवागार ठेवण्याच्या उद्देशाने पत्राळी गावात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या उपक्रमांतर्गत एकूण १०० झाडे लावण्यात आली. यामध्ये बहाडोली जांभूळ (५०), करंज (१०), राणआवळा (१०), खाया झाड (१०), गुलमोहर (१०) आणि इतर जातींची (१०) झाडे लावण्यात आली. प्रत्येक झाडाभोवती प्लास्टिक व बांबूच्या जाळ्यांची सुरक्षित कुंपणे बसवण्यात आली.

विशेष म्हणजे या झाडांच्या संगोपनासाठी गावातील तरुण व ग्रामस्थांना प्रत्येकी तीन झाडे दत्तक देण्यात आली असून, त्यांना ती झाडे वाढवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. पुढील वर्षी सर्वाधिक झाडे जगवणाऱ्या सहभाग्याला महासंघाच्या वतीने सन्मान व बक्षीस देण्याचे आश्वासनही समितीकडून देण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कोकण विभाग संघटक व लोकमत मुंबई आवृत्तीचे ज्येष्ठ पत्रकार पंकज राऊत यांनी भूषवले. प्रमुख पाहुणे म्हणून बोईसरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक , पथराळी च्या थेट सरपंच पिंकी प्रणय संखे, ह्यांची उपस्थिती लाभली.

ह्या कार्यक्रमाच्या निमंत्रणास मान देऊन शिवशक्ती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील, पालघर मनसेचे जिल्हाध्यक्ष भावेश चूरी, लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार निरज राऊत, एमआयडीसीचे अभियंता अमोल सानप सर ,जिंदाल कंपनीचे मॅनेजर राहुल पांडे , एडवोकेट ठाकूर प्रसाद ह्यांनी उपस्थिती दर्शवली.

कार्यक्रमाची सुरुवात उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय घरत यांनी केले. प्रस्तावना खजिनदार सुशांत संखे यांनी सादर केली. कार्यक्रमाची सांगता अध्यक्ष जगदीश करोतिया यांच्या आभारप्रदर्शनाने झाली.

या कार्यक्रमाचे आयोजन
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ पालघर जिल्हा कमिटीचे अध्यक्ष जगदीश करोतिया, उपाध्यक्ष रियाज मुल्ला, सल्लागार विजय बोपर्डीकर, सचिव संतोष घरत, खजिनदार सुशांत संखे, सहसचिव स्वप्नील पिंपळे, सदस्य ए. के. पांडे, जी. के. पांडे, शादिक शेख, सुनील मराठे, आणि प्रशांत करोतिया यांनी एकत्रितपणे केले.

या उपक्रमाला गावातील उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed