1 min read

उज्जैनकर फाउंडेशनची झूम मीटिंग संपन्न ,विविध जिल्ह्यांचे समन्वयकांची झाली निवड

Loading

 

*उज्जैनकर फाउंडेशनची झूम मीटिंग संपन्न*

*विविध जिल्ह्यांचे समन्वयकांची झाली निवड*

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगाव ची झूम मीटिंग नुकतीच संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या प्रसंगी नुकतेच 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या दुसरे अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलन पन्हाळा जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी डॉ. श्रीकांत पाटील व कोल्हापूर जिल्हा समन्वय समितीच्या माध्यमातून हे संमेलन ऐतिहासिक असे ठरले त्याबद्दल या सर्वांचा उज्जैनकर फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मनःपूर्वक आभार मानलेत याप्रसंगी या संमेलनाचे निमंत्रक डॉ. श्रीकांत पाटील संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कादंबरीकार प्रा.दी.बा. पाटील सर यांनी यासंदर्भात आपले मनोगत व्यक्त केले आणि श्री दि.बा.पाटील सरांनी आपल्या उज्जैनकर फाउंडेशनचे पुढील संमेलन बेळगाव कर्नाटका या ठिकाणी घ्यावे अशी सूचना सुद्धा त्यांनी केली याप्रसंगी पुढील दुसरे राज्यस्तरीय शिव बाल,किशोर, यूवा मराठी साहित्य संमेलन मंगळवेढा जिल्हा सोलापूर या ठिकाणी प्राचार्य डॉ. सुभाष कदम हे आयोजित करणार आहेत हे संमेलन डॉ. श्रीकांत पाटील यांच्या सहकार्याने होत असून त्यांनी पुढील संमेलन सुद्धा पन्हाळगडाच्या संमेलनाप्रमाणेच आयोजित केले जाईल असेही आश्वासन दिले.या सभेमध्ये पुढील संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध बाल साहित्यिक श्री बबन शिंदे, कळमनुरी जिल्हा हिंगोली यांच्या नावाची सूचना डॉ.श्रीकांत पाटील यांनी मांडली या सूचनेला फाउंडेशनचे राज्य अध्यक्ष तथा विचारवंत डॉ.सतीश तराळ यांनी अनुमोदन दिले त्याचप्रमाणे डॉ.श्रीकांत पाटील या संमेलनाच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष सौ. मनीषा पाटील, सांगली यांच्या नावाची सूचना त्यांनी मांडली याप्रसंगी राज्य कार्यकारिणीचे सचिव प्रा. डॉ. सुभाष बागल, औरंगाबाद यांनी या सूचनेला अनुमोदन दिले.
त्यानंतर फाउंडेशनचे विविध जिल्हा समन्वयकांची याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष डॉ. शिव चरण उज्जैनकर यांनी विविध जिल्ह्यांचे समन्वयकांचे नाव जाहीर केले ते पुढील प्रमाणे आहेत बुलढाणा जिल्हा दक्षता समितीचे संघटक म्हणून डॉ. निवृत्ती जाधव बुलढाणा जिल्हा महिला संपर्कप्रमुख सौ. रंजना बोरसे बुलढाणा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख श्री अरविंद शिंगाडे तसेच सावरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली त्याचप्रमाणे जळगाव जिल्हा दक्षता समितीचे सल्लागार म्हणून श्री मनोहर रोकडे जिल्हा ज्येष्ठ सल्लागार म्हणून प्राचार्य सुरेश वराडे जिल्हा संघटक भरत साळुंखे सर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली त्याचप्रमाणे पुणे जिल्हा समन्वयक म्हणून श्री बाळकृष्ण अमृतकर सर तान्हाजी बोराडे व कोमल नाईकडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्याचप्रमाणे जालना जिल्हा महिला समन्वयक म्हणून डॉ. शुभांगी करपे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली त्याचप्रमाणे धाराशिव जिल्हा समन्वयक म्हणून मधुकर हुजरे व महिला समन्वयक म्हणून कल्पना पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली तसेच ठाणे जिल्हा समन्वयक म्हणून श्री मधुकर उज्जैनकर यांच्या नावाची सुद्धा याप्रसंगी घोषणा करण्यात आली या झूम मीटिंगचे सूत्रसंचालन जळगाव जिल्हा दक्षता समितीचे सचिव प्रा. डॉ.राजकुमार कांकरिया यांनी केले तर बुलढाणा जिल्हा दक्षता समितीचे महिला समन्वयक शितल शेगोकार यांनी या सभेचे आभार प्रदर्शन केले. या सभेला जळगाव जिल्हा व बुलढाणा जिल्हा दक्षता समितीचे पदाधिकारी त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे सन्माननीय पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.