1 min read

उज्जैनकर यांचा मुक्ताईनगर तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघातर्फे पारंबी विद्यालयात सत्कार

Loading

उज्जैनकर यांचा मुक्ताईनगर तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघा तर्फे पारंबी विद्यालयात सत्कार

मुक्ताईनगर तालुका मुख्याध्यापक संघाची मासिक सभा नुकतीच नवीन माध्यमिक विद्यालय, पारंबी येथे नुकतीच संपन्न झाली. याप्रसंगी या सभेचे अध्यक्ष मुक्ताईनगर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा जे. ई. स्कूलचे प्राचार्य श्री. आर. पी. पाटील सर होते या सभेला प्रमुख उपस्थिती मुक्ताईनगर तालुका शा.पो.वा.चे तालुका अधिक्षक श्री. अजित तडवी साहेब उपस्थित होते याप्रसंगी पारंबी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक डॉ.शिवचरण उज्जैनकर यांना नुकताच ग्लोबल स्कॉलर्स फाउंडेशन, पुणे येथील जळगाव जिल्हा भूषण पुरस्कार महाराष्ट्र राज्य आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला त्याबद्दल या सभेमध्ये मुख्याध्यापक संघाच्या वतीने तालुका अध्यक्ष प्राचार्य आर. पी. पाटील सर यांनी उज्जैनकर यांचा शाल, श्रीफळ व बुके देऊन सत्कार केला याप्रसंगी सर्वांनीच उज्जैनकर यांच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छाही दिल्यात याप्रसंगी मुख्याध्यापक संघाचे तालुका सचिव श्री व्ही. एस. चौधरी मुख्याध्यापक संघाचे जळगाव जिल्हा सह कोषाध्यक्ष श्री पी.पी.दाणे संत मुक्ताई विद्यालयाचे श्री काटे सर शिवाजी हायस्कूल कु-हा, काकोडाचे श्री एस.डी. ठाकूर वडोदा हायस्कूलचे श्री एन. एस. धदर इच्छापुर विद्यालयाचे श्री बारी घोडसगाव विद्यालयाचे श्री संग्रामपूरकर हरताळा विद्यालयाचे श्री पाटील चांगदेव विद्यालयाचे श्री चौधरी उचंदा विद्यालयाचे श्री महाजन पिंपरी नांदू विद्यालयाचे श्री चौधरी कर्की विद्यालयाचे श्री वानखेडे कन्या विद्यालयाचे श्री पाटील चारठाणा विद्यालयाचे श्री संदीप पाटील आदि मुक्ताईनगर तालुक्यातील विविध विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक तसेच पारंबी विद्यालयाचे श्री. राजाभाऊ राठोड श्री. सुनील पाटील श्री. सुनील नानगे शिक्षकेतर श्री. रघुनाथ इंगळे श्री. विनायक इंगळे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापक संघाची ही सभा पारंबी विद्यालयात प्रथमच होत असल्याने ज्येष्ठ शिक्षक डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी सर्व सन्माननीय मुख्याध्यापकांचे शब्द सुमनांनी स्वागत केले व सर्व शिक्षक बंधूंनी उपस्थित सन्माननीय मुख्याध्यापकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. याप्रसंगी सूत्रसंचालन डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी केले.