

ढेकू केंद्राची शिक्षण परिषद शिस्तबद्ध व उत्साहात संपन्न…
माहे डिसेंबर 2022 शिक्षण परिषद जि प प्राथ शाळा रामेश्वर खु! येथे दि. 28/12/2022 बुधवार रोजी उत्साहात संपन्न झाली. यावेळी शिक्षणपरिषदेचे अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख श्री. दिलीप सोनवणे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी श्री. विश्वास पाटील साहेब, फाफोरे बीटचे शिविअ श्री. अशोकजी बिऱ्हाडे साहेब, मारवाड बीटचे शिविअ श्री. रावसाहेब मांगो पाटील उपस्थित होते. संमेलनात अनेक महत्वाच्या बाबींवर चर्चा तथा तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी जीवन कौशल्य: मानसिक तान तनावाचे व्यवस्थापन, शालेय स्पर्धा परिक्षेची तयारी (शिष्यवृत्ती परीक्षा), केंद्रातील आदर्श शाळांच्या उपक्रमांवर चर्चा व मार्गदर्शन, नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र दिग्दर्शन व आंतरक्रिया या संदर्भात सविस्तर दिग्दर्शन, विचारमंथन व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रश्नपेढी निर्मिती, निपुण चाचणी व संकलित मूल्यमापन यासंदर्भात देखील चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षण परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक गटशिक्षणाधिकारी श्री. विश्वास पाटील साहेब, शिविअ श्री. अशोक बिऱ्हाडे साहेब, शिविअ श्री. रावसाहेब मांगो पाटील, से.नि. केंद्रप्रमुख मा. श्री. गोकुळ पाटील यांनी मार्गदर्शन व मनोगत व्यक्त केले.
▪️सत्कारमूर्तींचा विशेष सत्कार..
यावेळी शिक्षक नेते तथा जिल्ह्यातील एक अभ्यासू नेतृत्व मा.श्री. रावसाहेब मांगो पाटील यांची मारवाड बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा केंद्राच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देतांना संघर्षमय इतिहास सांगत मा. रावसाहेब दादा अतिशय भावनिक झाले होते. तसेच फाफोरे बीटचे शिविअ म्हणून येत्या 31डिसेंबरला सेवानिवृत्त होणारे प्रमुख मार्गदर्शक मा.श्री. अशोक बिऱ्हाडे साहेब यांचाही ढेकू केंद्राच्या वतीने सेवापूर्तीनिमित्त विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी दोन्ही सत्कारमूर्तींना केंद्रातर्फे शिवराज्यभिषेक प्रतिमा देण्यात आल्या.
शिक्षण परिषदेत मा. केंद्रप्रमुख श्री. दिलीप सोनवणे सर यांनी सविस्तर विषयनिहाय आढावा घेत मार्गदर्शन केले सोबत श्रीम. आशा महाजन मॅडम श्री. राजेंद्र सोनवणे, श्री. धीरज पाटील, डॉ. कुणाल पवार, श्विषय तज्ज्ञ श्री. पंकज काटे यांनीही मनोगत, मार्गदर्शन व चर्चेत सहभाग नोंदवला. यावेळी तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष श्री. संदीप वाघ हे देखील उपेक्षित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामेश्वर शाळेचे मुख्याध्यापक श्री. योगेश पाटील यांनी केले तर आभार श्री. मनोहर पाटील यांनी मानले.