• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

पंचायत समिती चोपडा येथील अधिकारी, कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

Dec 29, 2022

Loading

पंचायत समिती चोपडा येथील अधिकारी, कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

चोपडा‌ वार्ताहर‌ जिल्हा परिषद, जळगाव अंतर्गत पंचायत समिती चोपडा येथील अधिकारी कर्मचारी यांच्या विविध क्रीडा स्पर्धा दिनांक २७ व २८ डिसेंबर रोजी क्रिकेट, कबड्डी, हॉलीबॉल, कॅरम, बुद्धिबळ, बँडमिंटन,खो-खो अश्या विविध प्रकारात स्पर्धा यशस्वी पार पडल्या सदर स्पर्धेत बहुसंख्ये अधिकारी व कमर्चारी यांनी सहभाग घेतला. सदर स्पर्धा जिल्हा परिषद जळगाव चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.डॉ. पंकज आशिया यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती येथील अधिकारी तसेच कर्मचारी यांचे आरोग्य, शारीरिक सधृढता, एक संघपणे काम करणे याबाबत जाणीव प्रभावीपणे सहाय्य होण्यास मदत होईल तसेच जिल्ह्यात क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासन करण्यासाठी पोषक वातावरण करणे आवश्यक आहे असे या क्रीडास्पर्धा आयोजनाचा उद्देश आहे.

सदर स्पर्धेचे अध्यक्षस्थानी व उद्घघाटक चोपडा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तथा क्रीडा समितीचे अध्यक्ष भरत कोसोदे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर गटशिक्षणाधिकारी तथा सचिव डॉ. भावना भोसले, कला शास्त्र व वाणिज्य महविद्यालय चोपडा येथील प्राचार्य डी ए सूर्यवंशी, क्रीडा समिती चे सदस्य तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासूरकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी एस आर धनगर, कृषी अधिकारी डी एम शिंपी, बांधकाम शाखा अभियंता दीपक डोखे, विस्तार अधिकारी पंचायत जितेंद्र पाटील, विस्तार अधिकारी शिक्षण सुधाकर गजरे,विस्तार अधिकारी कृषी योगिनी सोनवणे, केंद्र प्रमुख नरेंद्र सोनवणे, अशोक सैंदाणे,उत्तम चव्हाण, दीपक पाटील आदि उपस्थित होते.

सदर स्पर्धेच्या प्रास्ताविक मनोगतात क्रीडा स्पर्धेचे सचिव तथा गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले यांनी जीवनात स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी क्रीडा स्पर्धेचे मोठे योगदान आहे तसेच सर्वांनी सर्व क्रीडा स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन करून सर्वाना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षीय मनोगतात पंचायत समिती क्रीडा समिती अध्यक्ष तथा गट विकास अधिकारी भरत कोसोदे यांनी प्रत्येक कर्मचारीने प्रत्येक खेळात सहभागी झाले पाहिजे व उत्तम पद्धतीने खेळले पाहिजे. खेळामुळे खिलाडूवृत्ती अंगी बांधली जाते, जिंकण्यासाठी लढा; पण त्यामुळे कटुता येणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन केले व सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

सदर स्पर्धेत पंच म्हणून क्रीडा शिक्षक नरेंद्र महाजन, विजय पाटील, अरविंद जाधव, अजय सैंदाणे, ललित सोनवणे, जगदीश जाधव, अमोल पाटील, देविदास महाजन, आर टी पाटील, नईम शेख, बडगुजर सर, अब्दुल सलाम आदीनी भूमिका बजावली.

सदर क्रीडा स्पर्धा यशस्वी पार पडण्यासाठी पंचायत समिती क्रीडा समिती सदस्य उपशिक्षक आर पी आल्हाट, उपशिक्षक विवेक पाटील, पंचायत समितीचे पेसा तालुका समन्वयक प्रदीप बाविस्कर, स्वच्छ भारत मिशन चे तालुका समन्वयक जितेंद्र महाजन, विषयतज्ञ रविराज शिंदे,परीक्षित चव्हाण, राकेश पाटील, अमित डूडवे यांनी मेहनत घेतली. सदर स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रताप विद्या मंदिरचे क्रीडा शिक्षक नरेंद्र महाजन‌ यांनी‌ केले‌ तर‌ आभार‌ चोपडा पंचायत समिती स्वच्छ भारत मिशन चे तालुका समन्वयक जितेंद्र महाजन यांनी‌ मानले‌.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *