
सभासद बांधवांनो सहकार पँनलच्या अधिकृत उमेदवारांना निवडून द्या…
मा.अध्यक्ष संभाजी पाटील यांचे आवाहन
अमळनेर प्रतिनिधी- सहकार पॅनलचे प्रमुख भिरूडसर यांच्या वतीने मी सर्व सभासदांना आवाहन करतो की सहकार पॅनलचे प्रमुख दादासाहेब भिरूड यांचे काम माध्यमिक शिक्षक पतपेढीत सभासदांच्या हितासाठी त्यांनी चांगले निर्णय घेतले आहेत.
व त्यांनी सभासद हीत जोपासले आहे. सहकार पॅनलने आपला जाहीरनामा सुद्धा प्रसिद्ध केलेला आहे त्यात मयत सभासदांना संपूर्ण कर्जमाफी योजना राबविण्यात येणार आहे. सभासदाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास पाच लाखाचा विमा व अपघाती मृत्यू झाल्यास 25 लाखाचा विमा काढणार, एनपीएस धारक सभासदांना सेवानिवृत्ती प्रसंगी आर्थिक मदत देण्यासाठी योजना राबविण्यात येणार, सहकार तत्वावर पतपेढीच्या माध्यमातून वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणार, सभासद व कुटुंबियाची दरवर्षी आरोग्य तपासणी करणार, जामीनकी व विशेष कर्ज यांचा समतोल राखण्यात येईल, कर्जावरील व्याजदर कमी करणार, पतपेढीच्या कार्यालयातूनच सभासदांच्या खात्यात ऑनलाईन कर्ज वितरण करण्याच्या कार्यवाही करण्यात येईल, सभासद पाल्याचा विवाह उच्च शिक्षणासाठी विशेष कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, नोकर भरतीची गरज पडल्यास सभासद पाल्यांनाच प्राधान्य देण्यात येईल ,भविष्यात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या दीर्घ आंदोलनामुळे पगार थांबल्यास सभासदास अतिरिक्त कर्जाची व्यवस्था करण्यात येईल, नवीन इमारती स्त्री सभासदांसाठी रात्रीच्या मुक्कामासाठी व्यवस्था करण्यात येईल अशा अनेक योजना सहकार पॅनलच्या माध्यमातून आगामी काळामध्ये भिरूड सरांच्या व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहेत असेही त्यांनी सांगितले.
सभासदांचे हित व पतपेढीची भरभराट करायची असेल तर सहकार पॅनलच्या सर्व अधिकृत उमेदवारांना निवडून द्यावे असे आवाहन माननीय अध्यक्ष आप्पासो संभाजी पाटील यांनी अमळनेरला प्रचार दरम्यान आपल्या मनोगतातून सांगितले.
व्यासपीठावर मंगळ ग्रह मंदिर ट्रस्टी एस. एन. पाटील, कला अध्यापक संघाचे आर.डी. चौधरी ,मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष प्रकाश पाटील सर, प्रविण पाटील सर, उमाकांत हिरे सर,आर्मी स्कूल चे बाविस्कर सर, रमेश चव्हाण सर, प्रभाकर पाटील उपस्थित होते.
जळगांव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांची नागरी सहकारी पतपेढी मर्या.जळगाव
पंचवार्षिक निवडणूक 2022/2027 साठी टिडीएफ प्रणीत जळगाव जिल्हा मुख्याध्यापक संघ , जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, कलाध्यापक संघ , शिक्षकेतर कर्मचारी संघाचे
“”सहकार पॅनलचे “”
अ. न. 2 वर श्री मधुकर आनंदा पाटील (एम. ए. पाटील) मुख्याध्यापक शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर काॅलेज येथे ते कार्यरत आहेत. सध्या त्यांचा व मित्रपरिवारांचा ग्रामीण व शहरी भागात प्रचार दौरा जोरात सुरू आहे. सभासदांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ग्रामीण भागातील शाळेतील सभासदांशी हितगुज सेवानिवृत्त केंद्रप्रमुख आबासाहेब गोकुळ आनंदा पाटील,सुधाकर मुरलीधर पाटील, हनुमंतराव गुलाबराव पाटील, अविनाश बळवंत पाटील, सचिन ज्ञानेश्वर बहिरम व मित्रपरिवार उपस्थित होते.






