• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

अमळनेर नगरपरिषद प्रभाग क्रमांक 17 मधील रस्त्यांनी व नागरिकांनी घेतला मोकळा श्वास…

Feb 1, 2023

Loading

अमळनेर नगरपरिषद प्रभाग क्रमांक 17 मधील रस्त्यांनी व नागरिकांनी घेतला मोकळा श्वास…


अमळनेर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष नानासाहेब विनोद लांबोळे व नगरसेविका सौ.रत्नाताई प्रकाश महाजन यांच्या प्रभाग क्र.17 मधील अमलेश्वर नगर,शाहआलम नगर ते रामेश्वर नगर,श्रीराम कॉलनी या रस्त्यावरील रुंदीकरणाचे व काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. सदर रस्त्यात विद्युत संयंत्रे व विद्युत रोहीत्र येत असल्याने नागरिकांना रहदारीसाठी मोठा अडथळा निर्माण झालेला होता. सदर विद्युत सयंत्र व विद्युत रोहीत्र स्थलांतरित करण्यासाठी प्रभागाचे क्र.17 व अमळनेर नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष नानासाहेब विनोद लांबोळे यांनी महावितरण कंपनीला पत्र पाठवले होते. महावितरण कंपनीने सदर काम नगरपालिका हद्दीत येत असल्याने नगरपालिकेच्या निधीतून करण्याचे सांगितले. सबब सदर कामाकरिता उपनगराध्यक्ष विनोद रामचंद्र लांबोळे व नगरसेविका सौ.रत्नाताई प्रकाश महाजन यांनी नगरपालिका प्रशासक तसेच मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांना पत्रव्यवहार केला. सदर पत्र व्यवहार व पाठपुराव्यामुळे अमळनेर नगरपालिकेने दिनांक 21/10/2022 रोजी सदर कामाकरिता ठराव क्रमांक-6 मंजूर करण्यात आला. त्या ठराव्याच्या अनुषंगाने 1.3 योजनेअंतर्गत. अमलेश्वर नगर,शाहआलम नगर ते रामेश्वर नगर श्रीराम कॉलनी या रस्त्यावरील नागरिकांना व रहदारीला अडथळा असलेले विद्युत रोहित्र व संयंत्र दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाल्याने रस्त्याच्या व नागरिकांच्या रहदारीचा अडथळा कायमस्वरूपी नष्ट झाल्याने नागरिकांची चिंता मिटली.
सदर कामामुळे प्रभागा क्र.17 तील नागरिकांनी उपनगराध्यक्ष विनोद रामचंद्र लांबोळे व नगरसेविका सौ.रत्नाताई प्रकाश महाजन प्रशासक व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचे कौतुक अभिनंदन व आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *