
जि.प.आरोग्य कर्मचारी वर्गाच्या प्रलंबीत असलेल्या मागण्या सोडवा…
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी सो.जि.प जळगांव यांच्याकडे मागणी
चोपडा प्रतिनिधी
१) आरोग्य कर्मचारी वर्गाचे उशिराने होणारे मासिक वेतन विशेषतः 0621 या हेड चा निधी वेळेवर उपलब्ध न होणे, बाबत आपणांस वारंवार नोटीस देऊनही यांवर कायमस्वरूपी उपाय आपणाकडून केला जात नसल्याचे दिसून येते आहे, तरी याकडे आपण लक्ष वेधून, निधी उपलब्धी साठी, कायमस्वरूपी उपाय करून मासिक वेतन वेळेत कसे होईल याकडे आपण जातीने लक्ष द्यावे.
२)गेल्या वर्षाभरात अनेक आरोग्य सेवक/सेविका, आरोग्य साहाय्यक/सहाय्यीका व इतर सर्व आरोग्य सेवा कर्मचऱ्याना, १०/२०/३० कालबद्ध पदोन्नती लाभ मंजुर होऊन देखील, जिल्ह्यातील अजूनही बऱ्याच काही आरोग्य कर्मचऱ्याना, बिले मंजुरी साठी टाकलेली असून, अपुर्ण निधी अभावी ते सर्व कर्मचारी १ला२रा३रा आश्वासीत प्रगती योजनेचा लाभ भेटून देखील, त्याचा आर्थिक लाभापासून बरेच कर्मचारी अजूनही वंचीत राहिलेले आहेत,
याबाबत देखील आपणस वारंवार नोटीस दिली आहे,
तरी देखील आपण आपल्या स्तरावरून, लवकरात निधी उपलब्ध करण्यासाठी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नसल्याची दिसून येते, अशी आमच्या संघटनेची धारणा आहे.
३) जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यामधून कर्मचारी वर्गाला 2 ते 3 वर्षे लोटूनही कायमपणाचे फायदे /शिकाऊ काळ मंजूर केला गेलेला नाही, तरी त्वरित शिकाऊ काळ मंजुरी प्रस्ताव त्वरित मागवून ते पूर्ण मार्गी लावण्यात यावेत.
४) जिल्हयातील नवीन पद भरती प्रक्रिया किंवा जिल्हा बदली प्रक्रियेच्या आधी, माहे२०२३ पर्यन्तच्या (सर्व केडर निहाय) संभाव्य रिक्त असलेल्या ठिकाणी…
सर्व आरोग्य सेवक यांना आरोग्य सहाय्यक पदी तसेच आरोग्य सेविका यांना आरोग्य सहाय्यीका पदांवर,
आरोग्य सहाय्यक/सहाय्यीका मधून विस्तार अधिकारी पदावर…. त्वरित पदोन्नती पात्र लाभार्थी यांना पदोन्नतीच्या जागेवर त्वरित रिक्त पदे भरून घ्याव्यात.
५) आरोग्य वर्धिनी उपकेंद्रावर आमच्या आरोग्य सेविका भगिनींच्या खांद्याला खांदा लावून तळागाळातील जनतेला आरोग्य सेवा देत असणाऱ्या आमच्या अर्धवेळ परिचारिका बघिनींना ५ ते ६ महिने उशिराने मिळणारे मानधन हे, लवकर व्हावे,
त्यातल्या-त्यात त्यांना तुटपुंज्या मानधनात, म्हणजेच ८०ते ९० रुपये प्रति रोजाचे ३०००/-रुपयाचे दरमहा मानधन दिले जाते,
तेही ५/६ महिन्याच्या उशिराने होते आहे, त्यासाठी निधी उपलब्ध करून देणेसाठी देखील आपणांस वारंवार नोटिसा देऊनही आपण त्याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत आहात असे वाटते, म्हणूनच आपण अर्धवेळ परिचारिका यांचे मानधनाच्या निधी उपलब्धते करिता देखील, आपण स्वतः जातीने लक्ष घालावे, हि विनंती.
६) कर्मचारी भविष्य निर्वाह निधी GPF मधील जमा केलेले पैसे हे कर्मचाऱ्यांना सुखदुःखाच्या काळात हक्काचे काळी काढता येणारा पैसा असतांना, त्या पैश्या साठी देखील १० ते १२ महिने उशिरा होऊन देखील, संबंधित कार्यालयातून GPF ची बिले मंजूर केली जात नाहीत, तरी याची देखील आपणास प्रत्येक तक्रारी मध्ये देऊनही, हा प्रश्न मार्गी लागत नाही, तोही प्रश्न लवकर मार्गी लावावा.
७) प्रत्येक आरोग्य केंद्रातील कर्मचऱ्याना दुय्यम सेवा पुस्तक उपलब्ध करून मिळावे,
दर महा वेतनाची स्लिप मिळावी, याबाबत जिल्ह्यातील कोणत्याही प्रा आ केंद्रात अंमलबजावणी करण्यात आल्याची दिसून येत नाही, असल्यास तसे कर्मचारी निहाय सह्या घेऊन आपल्या कार्यालयात मागवावे,
व यावर तसे जिल्ह्यातील सर्व ठिकाणी अंमलबजावणी करणेत यावी.
८) बऱ्याच प्रा आ केंद्राच्या ठिकाणी कनिष्ठ सहाय्यक पद रिक्त असल्याने कर्मचारी वर्गाचे ऑनलाइन वेतन वेळेत दिले जात नाही,
तसेच दरमहा कर्मचाऱ्यांच्या वेतनातून होणाऱ्या (LIC/सोसायटी हप्ते/इतर कर्जाचे/व्याजाचे हप्ते इत्यादी) विविध आर्थिक कपातीची, वेळेमध्ये माहिती दिली जात नसल्यामुळे कर्मचारी वर्गांचे कर्जावरील जास्तीचं व्याज भरून आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो
९) जिल्ह्यातील सर्व केडर निहाय बहुतेक, आरोग्य कर्मचऱ्याना अश्वासीत प्रगति योजनेचा १ला २रा ३रा लाभ प्राप्त झाला असून, अजूनही बरेच सवर्गातील कर्मचारी लाभा पासुन वंचीत आहेत, तरी त्यांना देखील आश्वासीत प्रगती योजनेचा लाभ हा लवकर मिळावा.
१०) सालाबादप्रमाणे प्रत्येक सवर्गाची जेष्टता सुची दर वर्षी यादीत दुरुस्ती होऊन प्रत्येक कर्मचारी वर्गाला पाहण्यासाठी प्रसिद्ध करणे बंधनकारक असतांना देखील, ती सुधारित जेष्टता सुची दिली जात नाही, व कर्मचाऱ्यांचे हजर दिनांक/नाव बदल/जन्म तारखा बदल/जेष्टता नंबर बदल असल्याबाबत अवगत होत नाही,
वेळोवेळी सूचना देऊनही जेष्टता सुची दर वर्षी वेळेवर प्रसिद्ध केली जात नसल्याने, सर्व संवर्गनिहाय जेष्टता सुची दर वर्षी लवकर प्रसिद्ध केल्या जाव्यात.
प्रत्येक तक्रार निवारण सभेत आपणांस वरीलप्रमाणे सर्व मुद्दे वारंवार अवगत करून देखील, आपणाकडून आम्हांला फक्त केराची टोपली दिली जाते आहे,
म्हणून या सभेत अपेक्षा आहे की,
हे वरील प्रमाणे सर्व मागण्या आमच्या रास्त व स्थानिक पातळीवर सोडवण्याजोगी आहेत, आशा करतो की आमचे कुटुंब प्रमुख या नात्याने आपण याकडे स्वतः जातीने लक्ष केंद्रित करून प्रश्न सोडवावेत, अन्यथा नाईलाजाने आम्हां सर्व कर्मचारी वर्गाच्या रोषाचे स्वरूप संपात होऊ शकते,
तरी महोदय आपण आमच्या वरीलप्रमाणे प्रलंबित मागण्यांची त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी
विजय योगराज देशमुख अध्यक्ष
सर्व जिल्हा संघटना पदाधिकारी
म.रा.जि.प.आरोग्य सेवा कर्मचारी २५७/८९ संघटना जळगांव यांनी केले आहे.