

प्रा.डॉ. पाकीजा पटेल यांना खानदेश कन्या बहिणाबाई पुरस्कार.
जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील आदर्श गाव राजवडच्या राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त, शिक्षक नेत्या, आदर्श मुख्याध्यापिका प्रा. डॉ
पाकीजा उस्मान पटेल यांना खानदेश कन्या व महिला विकास मंडळ जळगाव यांच्याकडून खानदेश कन्या बहिणाबाई पुरस्कार 2023 माननीय डीवायएसपी केशव पातोंड, महानगरपालिका आयुक्त विद्याताई गायकवाड, समाजसेविका वैशाली कुराडे, सामाजिक कार्यकर्त्या मंगलाताई बारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 26 मार्च जळगाव येथे भव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले . प्रा. डॉ. पटेल यांनी केलेल्या उल्लेखनीय, भरीव व वैशिष्ट्येपूर्ण कार्याची दखल घेऊन समाज व राष्ट्र यांची प्रति समर्पित राहून निरपेक्षपणे केलेल्या कार्याला मिळालेली लोकमान्यतेची पावती म्हणून पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र मित्र परिवाराकडून अभिनंदन होत आहे.