
भारतीय संस्कृती ही विज्ञाननिष्ठच आहे अँड. श्री सुशिलजी अत्रे
डॉ. महेद्र शिरुडे – शिरुडे क्लासेस् येथे संस्कृत भारती व संस्कृत प्रसारिणी सभा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानाचे पहिले पुष्प गुंफताना श्री व्रजेशजी पंडित यांनी श्री गणपती अथर्वशीर्ष- एक वैज्ञानिक दृष्टीकोन या विषयावर बोलतांना वरील उद्गार व्यक्त केले. ते म्हणाले की आपल्या भारतीय संस्कृतीत गणपती अथर्व शीर्षच नव्हे तर आपले धार्मिक किंवा सामाजिक कर्मांच्या पाठीमागे काहीना काही तरी वैज्ञानिक कारण आहे, यावेळी श्रीमद्भगवदीता व श्री गणपती अथर्वशीर्ष यांचा संबंध ही त्यांनी पटवून दिला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अॅड-सुशीलजी अत्रे सर या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, प्रत्येक स्तोत्रा मागे कारण आहे पण आपण ते समजून घेत नाही म्हणून आपण मागे पडतो. ‘अमंत्रमक्षरं नास्ति।’ – म्हणजे एक अक्षर असे नाही की ज्यात मंत्र नाही. हे समजून घेण्यासाठी भाषाशास्त्राचा अभ्यास करणे तसेच उच्चार शास्त्रही जाणून घेणे तेवढेच गरजेचे आहे उदा. देतांना त्यांनी रामरक्षतील ‘र्’ची पुनरावृत्ती होणारा श्लोकाविषयी ही माहिती दिली. आपली वाणी शुद्ध करायची असेल तर आपण संस्कृत भाषा शिकली पाहिजे शब्दांचे अर्थ, स्तोत्रांतील रुपक अंतरंग समजून घेणे महत्वाचे आहे.या प्रसंगी मंचावर प्रसारिणी सभेच्या अध्यक्षा शोभाताई पाटील , सुशिलजी अत्रेंच्या मातोश्री ही उपस्थित होत्या. त्याच बरोबर कार्यक्रमात सौ .पल्लवीची जोशी व श्री. विजय शुक्ल यांचा त्यांनी संस्कृत विषयासाठी केलेल्या कार्या- बद्दल गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीश् चिपळोणकर , सूत्रसंचालन डॉ. अखिलेश शर्मा व आभार सौ. सुरेखा शिवरामे यांनी केले .कार्यक्रमा प्रसंगी शिरूड़े क्लासेसचे संचालक श्री. प्रा.डॉ महेंद्र शिरुडे व सौ. प्राजक्ता शिरुडे यांचे विशेष आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्विते साठी प्रा. अर्जुन शास्त्री, प्रा. गुरुदत्त महाजन, सौ. हर्षदा उपासनी, श्रीमती’ सारिका बोरसे, श्री.पंकज वराडे यांनी अनमोल सहकार्य केले .तसेच जळगाव शहरातील संस्कृत शिक्षक,संस्कृत चे अध्ययन करणारे विद्यार्थी व अनेक संस्कृत प्रेमींनी या कार्यक्रमास हजेरी लावली.