
अमळनेर च्या स्वाती देशपांडे यांना दोन राष्ट्रीय पुरस्कार
खानदेश कन्या व महिला विकास मंडळ, जळगाव,महाराष्ट्र राज्य यांचे विद्यमाने राष्ट्र व समाजाप्रती समर्पित राहुन निरपेक्ष पणे केलेल्या कार्याबद्दल पुरस्कार दिल्या जातो यावर्षीच्या (२०२३) पुरस्कारा साठी अमळनेर येथील श्री गजानन कोचिंग क्लासेसच्या संचालिका तथा शिक्षिका सौ. स्वातीताई आंबेकर (देशपांडे) यांची निवड करण्यात आली.
सौ. स्वातीताई या शिक्षिका असून अगदी सामान्य कुटुंबातील आहेत या दहावीपर्यंतच्या सर्व विषयांच्या ट्युशन इंग्रजी तसेच मराठी माध्यमातून शिकवतात सोबतच स्कॉलरशिप परीक्षा एस ओ एफ आणि नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी योग्य मार्गदर्शन करतात सौ.स्वातीताई यांनी स्वतः सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्र व समाजा प्रती कळकळ म्हणून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना अगदी मोफत शिकवतात
सौ. स्वातीताईंच्या या अनन्य साधारण कार्याची दखल घेत व महिला दिनाचे औचित्य साधून त्यांना खानदेश कन्या बहिणाबाई पुरस्कार(२०२३) देण्यात आला.
यात सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह यांचा समावेश आहे
या अगोदर त्यांना श्री साई बहुउद्देशीय संस्था नाशिक यांनी सुद्धा त्यांचा महिला दिनानिमित्त माॅ साहेब जिजाऊ राष्ट्रीय पुरस्कार (२०२३) दिला यात त्याना
सन्मानपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविले आहे.त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.