महापौर प्रतिभाताई चौधरी यांच्या उपस्थितीत पप्पू भैय्या रेलन यांच्या हस्ते
साक्री रोडवर वटकेश्वर महादेव शिवलिंग, नंदीची प्राणप्रतिष्ठा थाटात संपन्न

धुळे- येथील साक्री रोडवरील सिंचन भवन मागील लक्ष्मी नारायण मंदीराच्या आवारात वटकेश्वर महादेव धाम येथे वटकेश्वर महादेव शिवलिंग, नंदीची प्राणप्रतिष्ठा उद्योगपती पप्पू भैय्या रेलन यांच्या हस्ते व महापौर सौ. प्रतिभाताई चौधरी, नगरसेविका सौ. मंगलाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दि. 27 मार्च रोजी करण्यात आली. दिवसभर संपन्न झालेल्या या विधीव्रत धार्मिक कार्यक्रमात पुजाविधी, होमहवन प्राणप्रतिष्ठा व सायंकाळी भंडारा व महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मंदीर परिसरातील विविध कॉलन्यांमधील बंधू-भगिनी भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी परिसरातील नगरसेविका सौ. मंगलाताई पाटील, नगरसेविका सौ. सुशिलाताई ईशी, नगरसेवक बन्सीलाल भाऊ जाधव, उद्योगपती पप्पूशेट रेलन, सामाजिक कार्यकर्ते निनाद पाटील, योगेशभाऊ ईशी, आकाशशेट रेलन, कॉन्ट्रॅक्टर ब्राह्मणकर साहेब, शिंदे साहेब सुपरवायझर, यांचे विशेष बहुमोल सहकार्य लाभले. पालिकेचे स्वच्छता निरीक्ष रुपेश पवार, संदीप वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सफाई कामगार बंधु-भगिनींनी परिसर स्वच्छ केला होता. याप्रसंगी महापौर सौ. प्रतिभाताई चौधरी, नगरसेविका सौ. मंगलाताई पाटील, नगरसेविका सुशिलाताई ईशी, नगरसेवक बन्सीभाऊ जाधव यांनी भविष्यात कम्पाऊंड वॉल , बसण्यासाठी बाकांसह मंदीर परिसरात अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले.
या वटकेश्वर महादेव शिवलिंगाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी प्रारंभापासून परिसरातील ज्येष्ठ नागरिक मधुकर ओंकार सुर्यवंशी, गोविंदभाऊ सिंगलदिप यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. त्यांना परिसरातील भाविक सर्वश्री जगतसिंग राजपूत, जगन्नाथ माळी, जे. एफ. सौंदाणकर, जे. के. शंकपाळ, किशोर रनाळकर, पंडीत भामरे, पी. बी. खैरनार, मुकेश पंजाबी, पी.डी. गुरव, कैलास मंडोरे, पंडीत चौधरी, कंडक्टर सोनवणे, निकमदादा, रमेश सोनार आदींसह लक्ष्मीनारायण मंदीर परिसरातील युवक मित्रमंडळी यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यामुळेच वटकेश्वर महादेव धाम मंदीराची निर्मिती शक्य झाली. प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून मंदीरात दर्शनासाठी भगिनींसह भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढू लागली आहे.