• Tue. Jul 8th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

अर्बन बँक च्या निवडणुकीत सर्वसाधारण जनरल मतदार संघाचे लक्ष्मण पांडुरंग महाजन उर्फ पप्पू महाजन यांच्या नावाला मतदार देत आहे पसंती…

Jun 8, 2023

Loading

अर्बन बँक च्या निवडणुकीत सर्वसाधारण जनरल मतदारसंघाचे लक्ष्मण पांडुरंग महाजन उर्फ पप्पू महाजन यांच्या नावाची होत आहे चर्चा….

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- सध्या अर्बन बँक निवडणुकीला दोन दिवस बाकी आहेत.. सर्वच उमेदवार प्रचारार्थ मतदारांपर्यंत जात आहेत.. अमळनेर येथील माळी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते दादा सोमा महाजन, व पांडुरंग महाजन यांच्या आशीर्वाद व प्रेरणेने सर्वसाधारण जनरल मतदारसंघातून महाजन लक्ष्मण पांडुरंग उर्फ पप्पू महाजन आपली उमेदवारी करीत आहेत.. त्यांना मित्रपरिवार, समाज बांधव यांचा वाढता पाठिंबा मिळत आहे..ते युवा सामाजिक कार्यकर्ते असून त्यांना अर्बन बँकेमध्ये संधी मिळाली तर ते संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाहीत.. सभासद हितांसाठी नेहमीच कटिबद्ध राहतील यात शंका नाही..अर्बन
बँकेच्या निवडणुकीत तरुणांना संधी मिळाली पाहीजे अशी मतदारांची माफक अपेक्षा असते आणि ती माफक अपेक्षा महाजन लक्ष्मण पांडुरंग उर्फ पप्पू महाजन यांच्या नावाने सार्थ होणार आहे. पप्पू महाजन यांचा स्वभाव मितभाषी व सदैव मदतीसाठी धावून येणारे युवा व्यक्तिमत्व आहे.. प्रचारासाठी त्यांनी सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.. वेळ कमी असल्याने काही मतदारांपर्यंत ते येऊ शकले नसतील हेच त्यांचे आवाहन समजून मतदार बंधू भगिनींनी मतरूपी आशिर्वाद द्यावा..
तरी अमळनेर तालुक्यातील सर्व मतदार बंधू-भगिनींना नम्र विनंती आहे की अमळनेर को-आँप अर्बन बँक लि अमळनेर येथील सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जनरल मतदारसंघात स्वतंत्र उमेदवार म्हणून संचालक पदासाठी मी निवडणूक लढवीत आहे तरी आपले आशीर्वाद रुपी एक मत माझ्या नावासमोर अनुक्रम नंबर -4, चिन्ह -सिटी या चिन्हावर फुलीचा शिक्का मारून मला प्रचंड मतांनी विजयी करून सेवेची संधी द्यावी .

नेहमीच आपल्या सेवेत …
लक्ष्मण पांडुरंग महाजन उर्फ पप्पू महाजन (पांडुरंग नामदेव महाजन यांचे चिरंजीव) गणेश प्लायवुड अँड गणेश काच सेंटर अमळनेर
अनुक्रम नंबर -4
निशाणी शिटी

You missed