
अर्बन बँक च्या निवडणुकीत सहकार पँनलच्या महिला राखीव मतदार संघाच्या उमेदवार सौ वसुंधरा दशरथ लांडगे प्रचंड मतांनी विजयी होणार..
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- कोणताही कार्यक्रम असो सुख असो दुःख असो ..सौ वसुंधराताई दशरथ लांडगे व नानासो दशरथ सोमा लांडगे प्रत्येकाच्या कार्यक्रमात हजर असतात.. त्यांनी आजतागायत अनेक पद भूषवली आहेत. अमळनेरकर नागरिकांनी नेहमीच त्यांच्या चांगल्या कामाला पसंती व त्यांच्या मागे उभे राहिले आहेत हे तेवढेच सत्य..
ताईसाहेबांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्या उपक्रमशील शिक्षिका आहेत, सत्यशोधक पद्धतीने त्यांनी अनेक वधूवरांचे
लग्न लावलेले आहेत. बहुजन समाजाच्या नेत्यांचे पारायण केलेले आहेत… अनेक सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सहकार धार्मिक क्षेत्रात त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. लांडगे कुटुंब दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावून येणारे आहे.
अर्बन बँक च्या निवडणुकीत मागच्या वेळी ही वसुंधरा दशरथ लांडगे यांना बहुमताने निवडून सेवेची संधी दिली होती.. ताईंनी अत्यंत प्रामाणिकपणे काम केले.. सभासद हितांसाठी व बँकेच्या विकासासाठी पुनश्च त्यांना सहकार पॅनलने उमेदवारी दिली आहे व ताई महिला राखीव मतदार संघातून संचालिका पदासाठी उभ्या आहेत.. त्यांना अर्बन बँक च्या निवडणुकीत मतदार बंधू आणि भगिनींनी प्रचंड बहुमताने विजयी करावे व सेवेची संधी द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे..
नेहमीच आपल्या सेवेत
सौ वसुंधरा दशरथ लांडगे
मा. संचालिका अर्बन बँक व विश्वस्त खाशी मंडळ अमळनेर
अनुक्रमांक-2
चिन्ह-कपबशी