• Tue. Jul 8th, 2025 6:47:51 AM

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

तेलंगणा चार दिवसीय दौऱ्यामध्ये दहीवदच्या मा.लोकनियुक्त सरपंच सुषमाताई देसलेसह सरपंच उपसरपंच यांनी घेतला सहभाग

Jun 13, 2023

Loading

तेलंगणा चार दिवसीय दौऱ्यामध्ये अमळनेरच्या तीन मा. सरपंच उपसरपंच यांनी घेतला सहभाग

सरपंच परिषदेच्या माध्यमातून तेलंगणा विकासाच्या योजना घेतल्या जाणून…

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर तालुक्यातील दहीवदच्या मा.लोकनियुक्त सरपंच व महिला सरपंच परिषदेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा सुषमाताई देसले व शिरुड उपसरपंच कल्याणी पाटील, कन्हेरचे सरपंच चंद्रकांत पाटील.यांनी महाराष्ट्र सरपंच परिषदेच्या चार दिवसीय दौऱ्यामध्ये भाग घेऊन तेलंगणा सरकारच्या योजना व विकासाची माहिती जाणून घेतली..
सविस्तर माहिती अशी कि तेलंगणा दौरा 4 दिवसाचा होता. तेथील कृ. उ बा. समिती शेतकरीसाठी काय योजना आहेत, त्यांना सरकार काय मदत करते व ग्रामविकास कसा झाला आहे, तेथील मागासवर्गीय कोणत्या योजना आहेत, त्यांचा जीवन स्तर उंचावण्यासाठी शासनाने काय काय योजना राबविण्यात आलेल्या आहेत त्याचा अभ्यास दौरा केला . मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव व त्यांच्या मंत्रिमंडळातील अधिकारी यांच्याशी चर्चा केली..
सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रचे प्रदेश अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे बीड व उपाध्यक्ष विकास जाधव बार्शी यांच्या नेतृत्वाखाली 23 पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष ,विभागीय अध्यक्ष ,समन्वयक सरपंच परिषद मुंबई पदाधिकारी गेले होते.त्यात अमळनेरच्या तीन पदाधिकारी म्हणून आम्हाला सहभागी करून घेतले तुमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.. तेलंगणा सरकारने केलेला विकास अभिनंदन आहे. निश्चितच ग्रामीण भागामध्ये काम करत असतांना त्याचा फायदा होईल व जनतेच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना राबवता येतील असे सरपंच परिषदेच्या उत्तर महाराष्ट्र महिला प्रमुख, व माननीय लोकनियुक्त सरपंच दहिवद व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका सौ सुषमा वासुदेव देसले यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed