अमळनेरला पंचायत समिती अधिकाऱ्यांच्या
उपस्थितीत तक्रार निवारण सभा संपन्न
विविध विषयांवर झाली चर्चा


अमळनेर प्रतिनिधी
आज दिनांक 26 6 2023 रोजी माननीय गटविकास अधिकारी शिंदे साहेब, गटशिक्षण अधिकारी विश्वासराव पाटील साहेब,विस्तार अधिकारी पी डी धनगर साहेब व विस्तार अधिकारी रावसाहेब पाटील साहेब पंचायत समिती अमळनेर यांच्या उपस्थितीत तालुका तक्रार निवारण समितीची सर्व शिक्षक संघटना अध्यक्ष व सरचिटणीस यांची सभा घेण्यात आली. सभेतील विषय पुढीलप्रमाणे
1) दिव्यांग कर्मचारी चे कामे प्राधान्याने करण्यात यावे तसेच सेवा पुस्तक अद्यावत करणे व पडताळणी करणे.
2) सर्व दिव्यांना बी.एल.ओ चे कामे देऊ नयेत.
3) शालेय पोषण आहार अनुदान वाटप अहवाल माहेवार कमी जास्त अनुदान बाबत मार्गदर्शन अनुदान खर्चाची p.d.f तालुकास्तरावर देण्यात यावी .स्वयंपाकी मदतनीस मानधन वेळेवर मिळावे.
4) समग्र शिक्षा अनुदान खर्च दिल्यानंतर विना विलंब तालुका स्तरावरून व्हेंडर तयार करून खर्च करून मिळावा
5)G.P.F चा दुसरा हप्ता अजून जमा झालेला नाही त्याबाबतीत आपल्या स्तरावरून लवकर कारवाई करण्यात यावी.
6) सेवा पुस्तकातील रजा अद्यावत करण्यात याव्या व त्या नियमित भरण्यात यावे.
7) निवड श्रेनीतील त्रुटी दूर करून नवीन प्रस्ताव सादर करणे.
8) काही शाळांनी इन्कम टॅक्स अकाउंट खाते नंबर दिलेला नाही त्यासाठी संघटना प्रतिनिधी यांनी sbi bank शाखेत जाऊन अधिकचे प्रयत्न करावेत.
9) दुय्यम सेवा पुस्तक भरून शिक्षकांना देण्यात यावे त्याचे नियोजन केंद्रनिहाय करण्यात यावे
10) हिंदी भाषा सुट देणे साठी सर्व तालुक्यातील शिक्षकांची यादीस मंजुरी देण्यात यावी तशी नोद सर्व्हीस बुकात घेणेत यावी .
वरील सर्व विषयांवर सखोल चर्चा होऊन तक्रार निवारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. तक्रार निवारण सभा दर तीन महिन्यांनी घेण्यात येईल असे माननीय गटशिक्षनाधिकlरी विश्वास पाटील यांनी सांगितले.
सदर सभेस सर्व सन्माननीय केंद्रप्रमुख सर्व संघटनांचे अध्यक्ष व सरचिटणीस(वाल्मीक मराठे,सुनील मोरे, गजानन चौधरी,विनोद पाटील,राजू कोळी,आनंदराव अहिरे,सुधीर चौधरी,छगन पाटील,रवींद्र पाटील) कार्यालयीन सर्व स्टाफ उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील यांनी सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देऊन सर्व शिक्षक संघटना चे आभार मानले तक्रार निवारण सभा शांततेत पार पडली