

कल्याण येथे शालेय जिल्हास्तरीय सेपक टकराव स्पर्धा संपन्न..
नविन खेळात शाळांचा सक्रिय सहभागामुळे खेळाडूंमध्ये चैतन्य:: कृष्णा बनगर
ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी ) क्रिडा व युवक संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद ठाणे व कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण क्रीडा व सांस्कृतिक विभाग आयोजित जिल्हास्तरीय सेपक टकराव स्पर्धा 2023 24 चे कल्याण येथील यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथे क्रीडा पर्यवेक्षक प्रविण कांबळे, यांचा मार्गदर्शनाखाली, खेळ प्रमुख सुभाष गायकवाड , मॉडेल कॉलेज कल्याण पूर्व क्रीडा संघटक कृष्णा माळी, कृष्णा बनगर, दिनेश पवार,क्रीडा शिक्षक रविन्द्र देसाई भारती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली १४,१७,१९ वर्षाखालील मुलां मुलींचे जिल्हास्तरीय शालेय सेपक टकराव स्पर्धा आयोजित करण्यात आले होते.या स्पर्धेसाठी आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ. मणिलाल शिंपी यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
१९ वर्षाखालील गटात प्रथम मॉडेल कॉलेज द्वितीय अभिनव विद्यालय विजेता ठरले
तर 17 वर्षांखालील मुलांमध्ये प्रथम आर्या गुरुकुल द्वितीय मॉडेल कॉलेज कल्याण विजेता
मुलींमध्ये प्रथम सेंट मेरी स्कूल विजेता द्वितीय हॉली क्रॉस स्कूल
तसेच .
१४ वर्षाखालील स्पर्धेत मुलांमध्ये आर्य गुरुकुल द्वितीय सेंट मेरी
मुलींमध्ये प्रथम सेंट मेरी स्कूल द्वितीय आर्य गुरुकुल यांनी बाजी मारली.पंच प्रमुख म्हणून सागर कावळे सहाय्यक पंच ,विनित तसेच पूजा काळे व स्वप्नाली परब यांनी पाहिले. स्पर्धा प्रमुख सुभाष गायकवाड यांनी संपूर्ण नियोजनाचे काम पाहिले.