• Tue. Jul 8th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

मराठी लाईव्ह न्युजचा चौथ्या वर्धापन दिन निमित्ताने ‘सत्कार कर्तुत्वाचा’ हा कार्यक्रमाबाबत सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छा! आम्हाला भविष्यात प्रेरणादायी व बळ देणा-या आहेत….

Nov 16, 2023

Loading

मराठी लाईव्ह न्युजचा चौथ्या वर्धापन दिन निमित्ताने सत्कार कर्तुत्वाचा हा कार्यक्रमाबाबत सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छा आम्हाला भविष्यात प्रेरणादायी व बळ देणा-या आहेत….

१)
श्रीमान ईश्वर महाजन,
मुख्य संपादक, मराठी लाईव्ह न्युज अमळनेर, जि. जळगाव.
सप्रेम नमस्कार.
समाजातील चांगल्या वाईट घटनांचा ठाव घेत असताना मराठी लाईव्ह न्युजच्या चौथ्या वर्धापन दिनी रविवार, दिनांक १२ नोव्हेंबर २०२३ रोजी ‘सत्कार कर्तृत्वाचा’ कार्यक्रम पार पडला. सूत्रसंचालन बहारदार असेल तर कोणताही कार्यक्रम वावगा ठरत नाही, असे माझे मत आहे. असंच बहारदार सूत्रसंचालन करणाऱ्या सौ. वसुंधराताई लांडगे यांच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रम बहारदारच नव्हे तर नियोजनबद्ध केला. कार्यक्रम घेण्यापूर्वी आपली तळमळ मी जवळून पाहिली आहे. पूज्य सानेगुरुजींच्या विचाराने प्रेरित भूमी म्हणजे अमळनेेर. ‘खरा तो एकची धर्म.. जगाला प्रेम अर्पावे..’ या पंक्तीनुसार आपण स्वतः कार्यातून व नामवंत मान्यवरांच्या मुखातून चांगल्या विचारांची पेरणी कार्यक्रमातून केली आहे. ते विचार अनेकांनी मनाच्या कोपऱ्यात साठवले आहेत. अनेक संस्थात पैसे घेऊन पुरस्कार दिले जातात. तेथे ज्यांना पुरस्कार मिळतो त्यात काही व्यक्तीचा भूतकाळ काही वेगळाच असतो. मात्र आपण पुरस्कारासाठी ज्या व्यक्तींची निवड केली ती कौतुकास्पद होती. पोटभरु विकाऊ पत्रकारितेमुळे चांगल्या पत्रकारांना गालबोट लागते. मात्र.. आपण स्वेच्छेने ‘सत्कार कर्तृत्वाचा’ कार्यक्रम करणारे अमळनेरचे पहिले पत्रकार असावे. कार्यक्रमासाठी जमलेले श्रोते लक्ष्मीपूजनाच्या पवित्र दिवशी शेवटपर्यंत खुर्चीवर खिळून होते. मराठी लाईव्ह न्युज च्या वर्धापनदिन निमित्ताने अमळनेेर च्या पत्रकारितेची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. पुढील वाटचाल अशीच यशदायी राहो..!

मा.संजय सूर्यवंशी,
अध्यक्ष, यमुनाई प्रतिष्ठान
संपादक, दिव्यचक्र न्यूज पोर्टल

२)आदरणीय ईश्वर महाजन सर आपली लेखणी सर्वसामान्य माणसासाठी आहे..
म्हणून त्याचबरोबर अविरत लेखन हा आपला ध्यास आहे. पत्रकारिता हा तुमचा श्वास आहे यात अतिशययुक्ति अजिबात नाही तसेच आपण भन्नाट व्यक्तिमत्त्व वैज्ञानिक विषय ऐतिहासिक विषय आणि गुन्हेगारी विषयांपासून सामाजिक शैक्षणिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक साहित्यिक कलाविषयक घटनांपर्यंत चिकित्सक आणि संशोधन प्रवृत्तीने आपलं लेखन असतं तसेच आपले मराठी भाषेवर प्रभुत्व आहे . साधा स्वभाव, साधी राहणीमान सडेतोडवृत्ती ही आपले वैशिष्ट्य आहे .आपल्या लेखनातून आणि राहणीमानातून दिसते म्हणून आपल्या मराठी लाइव्ह चँनल मार्फत आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसांची प्रसिद्धी आपण करत असतात योग्य न्याय देत असतात नक्कीच आपला चॅनल सर्वांसाठी चांगले आहे.आपणास भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..
मा.प्रकाश पाटील
तालुकाध्यक्ष
मुख्याध्यापक संघ अमळनेर

३)मराठी लाइव पोर्टलचा चौथा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात साजरा झाला त्याची दखल विविध क्षेत्रातील नामवंतांनी घेऊन उत्स्फूर्त व प्रेरक प्रतिक्रिया देऊन केले श्री ईश्वर महाजन सरांनी समाजातील विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचे सूक्ष्म गुनगृहन करून त्यांची यथायोग्य निवड केली उदाहरणार्थ शिक्षण क्षेत्रातील उदार व समाजाप्रती भान ठेवून मोफत मार्गदर्शन कळकळीने करणारे विजय पवार सर पर्यावरण अध्यात्म उद्योजक या क्षेत्रात काम करणारे कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार सरांनी केला समाज घडणीचे उत्कृष्ट कार्य करून पत्रकारितेचे सकारात्मक रूपाचे दर्शन घडवले सरांच्या या स्तुत्य उपक्रमास हार्दिक शुभेच्छा.. परमेश्वर त्यांना अशाच विधायक कार्याचे प्रेरणा देवो व त्यातून निरामय समाजाचा उदय होवो हिच शुभेच्छा..

बी.एस.जाधव
सेवानिवृत्त शिक्षक व संचालक सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर

४)मराठी लाईव्ह न्युज चा चौथा वर्धापन दिवस अत्यंत नयनरम्य व अनोख्या पद्धतीने साजरा झाला अमळनेर अमळनेर परिसर सबंध महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर काम करणारा मराठी लाईव्ह न्युज अतिशय लोकप्रिय ठरलेला आहे तळागाळातील लोकांच्या संवेदना भावना घडामोडी हालचाली अत्यंत महत्त्वपूर्ण संदेश या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचत असतात आदरणीय ईश्वर महाजन सरांना खूप खूप धन्यवाद देऊ इच्छितो कारण त्यांनी समाजातील तळागाळातील निस्वार्थ सेवा करणाऱ्या व्यक्तींना शोधून त्यांचा यथोचित सन्मान केला याबद्दल सदैव त्यांचे ऋणी राहू. अतिशय सुंदर दिमाखदार पद्धतीने वर्धापन दिवस साजरा झाला व आगळ्यावेगळ्या प्रथेचा पायंडा मराठी न्यूज ने केला त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व धन्यवाद.

पक्षिमित्र अश्विन पाटील सर(पुरस्कारर्थी)
अमळनेर

५)’मराठी लाईव्ह न्यूज ‘ चॅनेल चा 4 था वर्धापनदिनाचा कार्यक्रम फारच अप्रतिम झाला. अगदी काटेकोर, नियोजनबद्ध, प्रभावी व्यवस्थापन होते. प्रेक्षकांना उत्तम विचार ऐकायला मिळाले. विनयशील पत्रकाराने माणसे जोडुन माणुसकीचा सुंदर प्रयोग मनाला खूप भावला. जे तुम्ही लोकांना देता ते कितीतरी पटीने परत मिळते हा प्रत्यय आला. मराठी लाईव्ह न्यूज चॅनेल वाचकांच्या हृदयापर्यंत पोहचलेले आहे. उत्तमोत्तम प्रगती होवो ही सदिच्छा!!

एस. एच. भवरे
तालुकाध्यक्ष
ओबीसी शिक्षक असोसिएशन अमळनेर

६)
मराठी लाईव्ह न्युज च्या वर्धापन दिनानिमित्ताने कार्यकर्तृत्वाचा सन्मान प्रतिभेचा ——–!
मराठी लाईव्ह न्युज चॅनलचे चौथे वर्धापन दिनाचे औचित्य साधून दीपोत्सवाप्रमाणे सर्व उपस्थितांचे जीवन शब्द संपन्नतेने प्रकाशमय केले. ‘ जसं शरीराला अन्नाची गरज, तसं मनाला वाचनाची गरज’ या उक्तीप्रमाणे मराठी लाईव्ह न्युज चे संपादक ईश्वर महाजन सर यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर अजोड ममत्व, प्रभुत्व, गुरुत्व आणि शितल कार्यकर्तुत्वाच्या माध्यमातून ‘ माझ्या मराठी लाईव्हची बोलू किती कौतुके, महाराष्ट्रीयन माणसाची हृदयी पैजा जिंके’ याप्रमाणे ईश्वर महाजन सरांनी नॉर्थ ईस्ट वेस्ट साउथ (NEWS ) दिशांमध्ये मनामनांसी जोडणारे जाळे विणले आहे. पुरस्कार्थी निवड व्यक्ती आणि त्यांची कार्यशक्ती पाहून विज्ञान, कौटुंबिक, आध्यात्मिक, सामाजिक, राजकीय, संस्थात्मक, दिव्यांगासाठीचे कार्य, पक्षीमित्र, युवा प्रेरणा, उद्योजक अशा क्षेत्रात कर्तृत्ववान व्यक्तींचा समारंभ पूर्वक भेटवस्तू, सन्मानपत्र देऊन एक आगळी आणि वेगळी दिशा मराठी लाईव्ह न्युजच्या माध्यमातून निर्माण झाली आहे. सदरच्या कार्यक्रमासाठी लाभलेले अध्यक्ष म्हणजे एक अष्टपैलू असं व्यक्तिमत्व व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष तसेच ‘ मंगळग्रह सेवा संस्था ‘ चे अध्यक्ष श्री दिगंबर महाले सर यांच्या अध्यक्षीय मनोगतातून श्रद्धा ,अंधश्रद्धा आणि आपल्या कार्यकर्तृत्वाची कुशलता यातून विविध पैलू उपस्थित सर्व जनमनावर कोरले केले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित सर्व मान्यवरांचेही आगळे आणि वेगळे विचार सर्व आमंत्रित जनमानसात हृदय रुपी शेतीवर पेरण्यात आले.

डि.ए.सोनवणे
शहराध्यक्ष
ओबीसी शिक्षक असोसिएशन अमळनेर

७)महाजन सर राम राम
मराठी लाईव्ह न्युज च्या माध्यमातून आपण जेविविध व्यवसायातील चांगले काम करणारे व्यक्तींना शोधून उत्तेजित प्रोत्साहित करून, व न भूतो न भविष्य असे नगरीतील आपण जे रत्न शोधण्याचे कार्य करत आहात व त्यांना विविध क्षेत्रा तीन मान्यवरांना जो सत्कार करीत आहात त्या कार्यास अभिनंदन या उपक्रमामुळे खरोखर अडगळीत पडलेल्या कर्तुत्वानांना प्रेरणा मिळेल आपल्या कार्यास सॅल्यूट
हो परंतु कर्तुत्वान हिऱ्यांपेक्षा रत्नांपेक्षा आपण खूप मोठे आहात कारण रत्नांपेक्षा रत्नपारखी श्रेष्ठ असतो असे महाजन सर तुम्ही रत्नपारखी आहात पुढील भविष्यात खूप मोठा कार्यक्रम घडो आपल्या हातून असेच सत्कार्य घडत जाऊ हीच श्री भद्रा मारुती चरणी प्रार्थना
आण्णासाहेब साळी
भद्रा प्रतिक माँल अमळनेर

८)
संस्नेह नमस्कार

पुरस्कार मिळणे म्हणजे चांगले काम केल्याची एक प्रकारची पावती असते. पुरस्काराने व्यक्तीचा उत्साह तर वाढतोच शिवाय इतरांना आणि त्या व्यक्तीलादेखील चांगले काम करण्याची प्रेरणा मिळते, दिव्यांग सेवा, हीच ईश्वर सेवा ! हेच ध्येय समोर ठेवून सन २००५ पासून अनाथ, निराधार दिव्यांग (मतिमंद) मुलांसाठी परिश्रम मतिमंद मुला मुलींची निवासी विशेष शाळा, पारोळा येथे चालवित असून आदिवासी,बहुल दिव्यांगांसाठी कार्य करीत आहे.व त्यांना स्वावलंबी बनविणे हेच ध्येय उराशी बाळगून ही सेवा सुरू आहे.मला दि.12/11/2023 रोजी मराठी लाईव्ह न्युज बेस्ट ॲवॉर्ड प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार मी माझ्या आई वडिलांना समर्पित करू इच्छितो. आज मी जो काही आहे तो माझ्या आई वडिलांच्या मेहनतीमुळे आहे. शिवाय, माझी पत्नी आणि मुले,बहिणी ,क्षत्रिय माळी समाज व इतर सर्व समाज, मित्र परिवार,माझे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्वांच्या ऋणात राहु इच्छीतो.माझ्या आयुष्यात माझ्या मित्रांचेही खूप खास स्थान आहे. पुरस्कारामुळे माझ्या आयुष्यातील अनेक कठीण प्रवास मी सहज पार करेल मला कठोर परिश्रम करण्यास प्रवृत्त करण्यात आपणा सर्वांचे सहकार्य मोलाचे आहे.
मला मराठी लाईव्ह न्युज बेस्ट ॲवॉर्ड प्रदान करण्यात आला.मला या अभुतपुर्व क्षणाचे साक्षीदार केले.त्याबद्दल मा ईश्वर महाजन सर मुख्य संपादक मराठी लाईव्ह न्युज अमळनेर सर्व परिवार यांचा मनापासून खूप खूप आभारी आहे.

सदैव आपल्या ऋणात राहु इच्छीतो

आपलाच,
डॉ योगेश रघुनाथ महाजन सर(पुरस्कारर्थी)
अध्यक्ष परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा जिल्हा जळगाव.

९)
मराठी लाइव्ह न्यूजने जपली सामाजिक बांधिलकी
केवळ चार वर्षात जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात आपल्या उत्कृष्ट कार्य प्रणालीची अभूतपूर्व छाप पाडणाऱ्या मराठी लाईव्ह न्यूज ने आम्हा पती – पत्नीला आदर्श माता – पिता पुरस्काराने सन्मानित केले त्याबद्दल आम्ही त्यांच्या ऋणात राहू इच्छितो .
मुख्य संपादक श्री ईश्वर महाजन सर यांनी अतिशय प्रामाणिकपणे , सचोटीने , निष्ठेने नैतिकतेची जोड देऊन , काळाची पावले ओळखून , सर्वच क्षेत्रातील समाजातील योग्य तो ठाव घेऊन आपली पत्रकारिता अपडेट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.
मराठी लाईव्ह न्यूजने आपले उत्कृष्ट , कृतिशील कार्य अविरतपणे , निर्भिडपणे समाजाचे हित जोपासत यशस्वीपणे चालू ठेवणे कामीं खूप खूप शुभेच्छा.
आम्हाला मिळालेला हा सन्मान , पुरस्कार आम्ही आमच्या आई – वडिलांना , परिवाराला , साने गुरुजी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार कै . बापूसाहेब गुलाबराव पाटील , सहकारी , मित्र परिवार व आजी माजी विद्यार्थांना समर्पित करतो .
मा.एस.डी.देशमुख(पुरस्कारर्थी)
सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक
सानेगुरुजी नुतन विदयालय अमळनेर
१०)
मराठी लाईव्ह न्युज च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्ताने सत्कार कर्तुत्ववान व्यक्तिचा या माध्यमातून आपण त्या व्यक्तीला अजून जास्त प्रेरणादायी केले कारण त्या व्यक्तिंना अजून आपल्या करत असलेल्या कार्यामध्ये काम करण्याची जास्त इच्छा शक्ती प्रकट झाली हा कार्यक्रम अगदी छान वाटला सण असून देखील त्या दिवशी महिला वर्ग उपस्थित राहिला सगळ्यांनी लक्षपुर्वक सगळ्यांचे मनोगत ऐकले अजून त्याच्यातून जास्त प्रेरणा मिळाली हा कार्यक्रम फारच प्रेरणादायी होता त्यामुळे खचून न जाता पंखाना बळ मिळाले आम्ही तुमचे शतशः आभारी आहोत…

ताईसौ ज्योती राजेंद्र पवार(पुरस्कारर्थी)
अध्यक्ष
महिला वारी प्रमुख
संत गजानन महाराज सेवा संस्था अमळनेर
११)
१२ नोव्हेंबर ला मराठी लाईव्ह न्यूज चा चौथा वर्धापन कार्यक्रमाला उपस्थित होतो..आमचे मार्गदर्शक मित्र व जेष्ठ पत्रकार आदरणीय ईश्वरजी महाजन सर यांनी या ऑनलाइन पोर्टलची मुहूर्तमेढ मागील चार वर्षापासून केली आणि हा हा म्हणता सकारात्मक पत्रकारितेच्या माध्यमातून नावलौकिक मिळवला..या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘कर्तुत्वाचा महासन्मान सोहळा’ पार पडला. त्यात अनेक कर्तुत्वात लोकांचा येथोचित सन्मान सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला अनेक राजकीय, अराजकीय सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती.त्यांच्या उपस्थितीतून आणि त्यांच्या बोलण्यातून ईश्वर महाजन सर यांच्या कर्तुत्वाचा लेखाजोखा सगळ्यांच्या समोर आला.हल्लीच्या युगात पत्रकारिता क्षेत्रात महाजन सरांसारखी माणस दुर्लभ आहेत.त्यांच्या कार्यकर्तृत्वाला माझा सलाम आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा…
शरद भिका पाटील
उपशिक्षक,आर्मी स्कूल,अमळनेर
तालुका सचिव,खान्देश साहित्य संघ,अमळनेर

१२)
आपले मराठी लाईव्ह न्यूज मी नियमितपणे बघतो , क्षणा क्षणात नवनवीन माहिती व तीही वास्तवदर्शी मिळते त्यामुळे आपण जिल्ह्याशी नियमित संपर्कात राहतो , आपले कार्य स्पृहणीय आहे , आपल्या कार्यामुळे आपल्याला अधिकाधिक यश मिळो ही मंगल कामना

जयसिंग वाघ
जेष्ठ साहित्यिक जळगांव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed