• Tue. Jul 8th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

मराठी लाईव्ह न्युजचा चौथ्या वर्धापन दिन निमित्ताने सत्कार कर्तुत्वाचा हा कार्यक्रमाबाबत सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छा!

Nov 17, 2023

Loading

मराठी लाईव्ह न्युजचा चौथ्या वर्धापन दिन निमित्ताने सत्कार कर्तुत्वाचा हा कार्यक्रमाबाबत सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छा!

आम्हाला भविष्यात प्रेरणादायी व बळ देणा-या आहेत….

१)
चांगल्या समाज निर्मितीसाठी चांगल्या
लोकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.. याच पार्श्वभूमीवर आपण मराठी लाईव्ह न्युज च्या वर्धापन दिनानिमित्त ‘सत्कार कर्तुत्वाचा’ हा कार्यक्रम राबवून आपण एक चांगला उपक्रम राबवला आहे.. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, अध्यात्मिक, विज्ञान ,पर्यावरण अशा विविध क्षेत्रातील नामवंत अशा लोकांची निवड करून आपण त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली ही फार अतिशय अभिमानाची गोष्ट आहे… आजच्या स्वार्थी युगात पाठीवर हात ठेवून लढं म्हणा असे म्हणणाऱ्यांची संख्या फार कमी झाली आहे ..
आपण हा उपक्रम राबवून निश्चितच त्यांना एक वेगळी प्रेरणा देण्याचं काम आपण केलेले आहे.. नोबल फाउंडेशनचे मा. जयदीप पाटील सर यांचाही आपण जो सन्मान केला तो खरंच वाखाण्याजोगे होता… त्यात जयदीप पाटील सरांसोबत आमचाही सन्मान आपण केलात जयदीप पाटील सरांनी त्या सन्मानामध्ये आम्हालाही त्यात एक संधी दिली..
त्याबद्दल मी आपले व आपल्या सर्व टीमचे मनापासून अभिनंदन करतो.. पत्रकारिता क्षेत्रांमध्ये आपण काम चांगले करत आहातं भविष्यातही अशाच चांगल्या उपक्रमांसाठी पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

उमेश काटे
पत्रकार अमळनेर

२)मराठी लाईव्ह न्युजच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या राज्यातील तमाम शिक्षक शिक्षकेतर बंधुभगिनींच्या वतीने हार्दिक शुभेच्छा! संपादक मा. दादासो. ईश्वर महाजन सरांनी गेली चार वर्षात सामाजिक , शैक्षणिक , औद्योगिक , सहकार , कृषी अशा सर्वच क्षेत्रात निर्भिडपणे , नि:शुल्क , पत्रकारीतेचे उत्तम उदाहरण महाराष्ट्रा समोर ठेवले आहे. लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ असणार्‍या पत्रकारीतेला खर्‍या अर्थाने न्याय दिला आहे. विशेषत: शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थी , पालक , शिक्षक यांच्यावरील आन्यायाविरुध्द वाचा फोडण्याचे काम मराठी लाईव्ह न्युजने सातत्याने केले आहे. आपल्या प्रामाणिक पत्रकारीतेचा सार्थ आभिमान आहे. आपल्या हातून असेच पत्रकारीता क्षेत्रातील निरंतर पवित्र कार्य घडत राहो! हिच सदिच्छा !!

  • ज्ञानदेव हांडे (राज्य कार्याध्यक्ष),
    महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटना मुंबई

३)आजचा डिजिटल मिडिया युगात वेब पोर्टल चालविणे ही एक स्पर्धा झाली आहे.या स्पर्धेत आपण अव्वल स्थान प्राप्त केले आहे.तसेच आपल्या पोर्टलला ISO नामांकन प्राप्त आहे.आपण ” मराठी लाईव्ह न्यूज”ला ते जसं आपण मुला बाळांची काळजी घेतो तसं वेब पोर्टलसाठी सर्व विधायक गोष्टी करायला तयार आहेत.या चढाओढीच्या काळामध्ये वेब पोर्टल सारख्या माध्यमातून आकर्षित होणे व लेखणी हातात घेणे आणि पोर्टल च्या माध्यमातून लिखाण करत राहणे ही गोष्ट मोठी आहे.आपली अशीच उत्तरोत्तर प्रगती उंचावत राहो, ह्या सदिच्छा व मंगलकामना!

अजय भामरे,
तालुकाध्यक्ष
व्हाईस ऑफ मिडिया,अमळनेर

४)
मराठी लाईव्ह न्युज च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त आत्ताच 12 नोव्हेंबर 2023 रोजी मराठी लाईव्ह न्युज चा 4 था वर्धापन दिन साजरा करण्यात आला. चौथा वर्धापन दिनानिमित्त मराठी लाईव्ह न्युज चे मुख्य संपादक पत्रकार आदरणीय दादासो ईश्वरजी महाजन सर आपले अभिनंदन आणि कौतुक करावे तेवढे कमी, खरे म्हणायचे झाले तर मला अतिशय आनंद झाला.
आनंदाचे पहिले कारण म्हणजे अमळनेर सारख्या सुसंस्कृत आणि आजूबाजूच्या तालुक्यांपेक्षा निश्चितच सर्व अंगांनी विकसित अशा या तालुक्यात आपण आपले न्यूज पोर्टल अतिशय चोकपणे बजावत आहात.अमळनेर हे एक असे शहर की ज्या शहराला सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक,भौगोलिक, वैज्ञानिक, राजकीय, ऐतिहासिक वारसा लाभला आहे. आणि या सर्व अंगांना अतिशय जवळून पारदर्शकपणे, स्वच्छमनाने, निपक्षपातीपणाने सामान्य जनतेसमोर आणण्याचे काम मराठी लाईव्ह न्युज च्या माध्यमातून आपण करत आहात,आणि करत रहाल यात शंकाच नाही.
अजून माझ्या आनंदाचे दुसरे कारण म्हणजे मराठी लाईव्ह न्युज च्या चौथ्या वर्धापनदिनी आपण सर्व क्षेत्रांमध्ये उत्तुंग भरारी घेतलेल्या अशा नामवंत व्यक्तींना सत्कार कर्तुत्वाचा पुरस्कार देऊन सत्कार समारोह त्या ठिकाणी ठेवला अशा पद्धतीने एक स्तुत्य उपक्रम चालू करणे याच्यासाठी मोठा गाढा अभ्यास असावा लागतो. तो तुमच्यात नक्कीच आहे आणि तुम्ही स्वतः अभ्यासू व्यक्तिमत्व आहात.
आणि शेवटी सामाजिक बांधिलकी जपून आपण पत्रकारिता करत आहात, आपल्या लेखणीतून असंख्य सामान्य जनतेला न्याय मिळतो, याचे आपल्याला भान आहेच.जनमानसात आपले पोर्टलचे आणि आपले नाव असेच वर्षानुवर्ष राहो अशा अभिनंदनपर शुभेच्छा देऊन थांबतो.
धन्यवाद

ए.बी.धनगर
आदर्श शिक्षक
माध्यमिक विदयालय करणखेडा

५)
आदरणीय महाजन सर,
सस्नेह नमस्कार…
आपण ‘मराठी लाईव्ह न्यूज’ च्या माध्यमातून करत असलेले कार्य अतिशय स्तुत्य असून 4थ्या वर्धापन दिनाच्या निमित्त “सन्मान कर्तृत्वाचा” या प्रेरणादायी उपक्रमातून समाजातील विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य करणाऱ्या महानुभवांना सन्मानीत करुन समाजात एक आदर्श घालून दिला.
वर्धापन दिनाच्या दिवशी दीपावली पूजनाचा दिवस असूनही हॉल भरगच्च भरलेला होता. तसेच सर्व वाचक, प्रेक्षक वर्ग पूर्ण वेळ खिळून राहिला यात आपली मेहनत, व्यवस्थापन कौशल्य व मराठी लाईव्ह च्या माध्यमातून जनमाणसाच्या हृदयात मिळवलेले स्थान याची प्रचिती आली.
सन्मान कर्तृत्वाचा” कार्यक्रमाचे आयोजन करुन समाजाला योग्य दिशा देण्याचे महान कार्य एक संपादक, पत्रकार म्हणून आपण करत आहात. मराठी लाईव्ह च्या माध्यमातून आपल्या हातून असेच उत्तमोत्तम कार्य घडत राहो व त्यामाध्यमातून राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव व्हावा. ह्याच वर्धापन दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

आपलाच
दत्तात्रय सोनवणे (उपशिक्षक)
समन्वयक, साने गुरुजी शैक्षणिक विचारमंच
उपाध्यक्ष, खान्देश साहित्य संघ अमळनेर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed