पाडळसरे धरणाची सुप्रमा कोणत्याही परिस्थितीत मिळवेलच….
ना.अनिल पाटील यांनी दिली कबुली..


अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
पाडळसे धरणासाठी आम्ही अजून किती थांबायचे? असा प्रश्न विचारत लोकांनी प्रलंबित सिंचन प्रश्न बैठकीत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांचेकडून धरणाचे काम गतीमानतेने व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली तर धरणाची सुप्रमा कोणत्याही परिस्थितीत मिळवेलच असे ना.अनिल पाटील यांनी जाहीर केले.
पाडळसरे धरण व तालुक्यातील सिंचनाचे प्रश्न या विषयावर पाडळसे धरण जनआंदोलन समितीच्या वतीने मंगळ ग्रह मंदिर संस्थानच्या सभागृहात समितीचे कार्यकर्ते विविध सामाजिक राजकीय व जल प्रश्नावर काम करणाऱ्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली.
ना.अनिल पाटील यांनी पुढे सांगितले की,राजकिय अडचणी दूर आता झाल्या आहेत. मंत्री म्हणून संधी मिळाली आहे,संधीच सोन करीत आहे.सध्या पिलरचे बांधकाम २० मीटर पर्यंत असून ३१ मे २०२४ पर्यंत २३ पिलर टॉप लेव्हल पर्यंत पोहचेल.टप्पा १ चा त्वरित फायदा तालुक्याला व्हावा म्हणून आग्रही असून Pmksy मध्ये समावेश झाला तर दोन्ही टप्पे होतील तर २९ आर्च बंधारेसाठी १०४ कोटीचे प्रस्ताव करीत आहोत त्यातून सिंचनाचे प्रश्न मार्गी लागतील असा विश्वास व्यक्त केला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मंगळ ग्रह मंदिर संस्थांचे अध्यक्ष डिगंबर महाले होते.यावेळी पाडळसे धरणाचे जलद गतीने काम होण्यासाठी चिंतन होणे गरजेचे आहे, असे इंजि.रंगराव पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले.तापी पाटबंधारे विभागाचे सेवा निवृत्त अधिक्षक अभियंता पवार यांनी यावेळी सांगितले की,
सदर धरणावर धरण बांधण्याआधी पुल बांधले गेले.मराठी लोकप्रनिधींनी अहिराणी पट्ट्यावर अन्याय केल्याने सिंचनाचे प्रश्न प्रलंबित राहिले आहे, पाडळसरे धरणाच्या बाबतीत पूर्वी तांत्रिक अडचणी निर्माण केल्या गेल्यात.मात्र आता तालुक्यातील मंत्री ना.अनिल पाटील यांचे माध्यमातून राज्यसरकार कडून सुप्रमा मिळवावी आणि खासदार यांनी ३ महिन्यात केंद्राकडून प्रकल्प निधी मंजूर करून आणांवा तसेच मंत्री महोदय यांनी १९९९ते २०२३ पर्यंतचे धरणाचे वळवलेले पैसे परत मिळवावे असे आवाहन केले.
माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी धरणाचे कामाचे टप्पा १ व टप्पा २ असे भाग कोणी केले? डिझाईन चुकीचे आहे असे सांगून काम लांबवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पेन्शन थांबवा, झारीतील शुक्राचार्यांना शोधा व धडा शिकवा असे आवाहन केले.धरणाचे तांत्रिक सल्लागार प्रकाश पाटील यांनी सांगितले की निम्न तापी प्रकल्प निम्न तापी प्रकल्प साडेतीन जिल्ह्यातील महत्वाचा व प्रवाही प्रकल्प आहे.धरणाचे पाणी ९२ की मी पर्यंत जाणार उपनद्यामध्ये २०० किमी पर्यंत पाणी थांबणार असल्याने सर्वांनी एकजुटीने सदर प्रश्नावर पुढाकार घेवून काम करावे. माजी आमदार स्मिता वाघ यांनीही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या समवेत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक होणे गरजेचे आहे असे यावेळी सांगितले.पाडळसे धरण जन आंदोलन समितीचे प्रमुख सुभाष चौधरी यांनी सांगितले की राज्य शासनाने सर्व मान्यता द्यायला हव्यात २०१२ पासून सुप्रामा नाही.केंद्रीय योजनेत समावेश होण्यासाठी आवश्यक त्या मान्यता राज्यशासन देत नसल्याने अडचणी आहेत असे दिसते.लोकांनी आता धरणासाठी किती दिवस वाट पाहावी? असा प्रश्न करीत समितीने पुढील आंदोलनाची दिशा ठरवावी या उद्देशाने त्रस्थ जनता आग्रही असल्याचे सांगितले. पाणी प्रश्नावरील सदर बैठकीच्या माध्यमातून जनजागृती व धरणाचे काम पुढे नेण्याचा मार्ग शोधण्याचा उद्देशाने बैठक संपन्न झाल्याचे आभार प्रदर्शन करताना रणजीत शिंदे यांनी सांगितले.सूत्रसंचलन उमेश काटे यांनी केले. सदर बैठकीस उत्तर महाराष्ट्र जल परिषदेचे अध्यक्ष विकास पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी प्रशासक सौ, तिलोत्तमा पाटील, संचालक प्रा.सुभाष पाटील, शेतकरी संघटनेचे अभिमन हटकर, ऋषिकेश गोसावी, प्रा.डॉ.ज्ञानेश्वर सूर्यवंशी, सरपंच गिरीश पाटील , धनगर दला पाटील,हिरामण कंखरे,महेश पाटील,आर बी पाटील,प्रशांत भदाणे, सुपडु बैसाणे, सुनिल पाटील,शिवाजी पाटील आदींनी धरणाबद्दल जनतेच्या वतीने अपेक्षा व्यक्त केल्या.यावेळी उपसभापती सुरेश पाटील, माजी प्राचार्य डॉ.एल ए पाटील, सौ.रीता बाविस्कर,सौ.वसुंधरा लांडगे,सुरेश पाटील,महेंद्र पवार,रामराव पवार,नरेंद्र पाटील,मनोहर पाटील,सौ.योजना पाटील,इंजी.दिनकर पाटील,भाऊसाहेब पाटील,प्रमोद घोडके,हिरालाल पाटील,निंबा पाटील, सुशील भोईटे,विजय पाटील, डि पी जैन, व्हीं ए पाटील,एस डी देशमुख,नितीन पाटील,दिलीप पाटील,अरविंद बाविस्कर, ज्ञानेश्वर इंशूलकर,हेमंत पाटील,भगवान कळंबे आदिंसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मंगळ ग्रह मंदिर संस्थानाच्यावतीने सदर बैठकीसाठी सहकार्य करण्यात आले.