
” खेलो इंडिया ” स्पर्धेत अमळनेरचा दिनेश बागडे हा महाराष्ट्रातून प्रथम
अमळनेर प्रतिनिधी
सर्व सामान्य कुटुंबातील अमळनेर ताडेपुरा येथील ” साने गुरुजी विद्यालयाचा 2012-13 दहावी बॅचचा माजी विद्यार्थी ( उत्कृष्ट कबड्डीपटू ) याने 107 kg वजनी गटात पॅरा लिफ्टिंग पॉवर स्पर्धेत महाराष्ट्रातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे . त्याची दिल्ली येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी स्तुत्य अशी निवड झालेली असून तेथून पॅरीस येथे होणाऱ्या इंटर नॅशनल स्पर्धेसाठी आपणां सर्वांकडून मनःपूर्वक शुभेच्छा .
हे दुर्दम्य यश त्याने आपल्या दुर्दैवी रेल्वे अपघातात पाय गमावून सुद्धा संकटावर यशस्वी मात करीत आपल्या जिद्द , चिकाटी , प्रचंड मेहनत , आई – वडिलांचे आशिर्वाद , वेळोवेळी मिळणारे गुरुजनांचे मार्गदर्शन व विशेषत: ” मसल्स फॅक्टरी जिम ” चे संचालक / ट्रेनर श्री किशोर महाजन यांच्या मार्गदर्शनाने मिळविले आहे मुख्याध्यापक संघाचे माजी तालुकाध्यक्ष व सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक एस डी देशमुख यांनी
त्याच्या घरी अभिजी दादा सोबत जाऊन अतिशय शांत , सुस्वभावी असणाऱ्या दिनेशचा घरगुती सत्कार केला.त्याला उज्वल भविष्यासाठी आपणां सर्वांकडून शुभेच्छा.